Motorola Edge 60 Launch: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने अलीकडेच भारतात Motorola Edge 60 Fusion आणि Edge 60 Stylus फोन लाँच केले आहेत. दरम्यान, कंपनी आता या सिरीजमध्ये तिसरे मॉडेल Motorola Edge 60 आणण्यासाठी सज्ज झाली आहे. हा 5G फोन 24 एप्रिल रोजी Motorola Razr 60 फ्लिप फोनसह जागतिक स्तरावर लाँच केला जाईल.
Also Read: Smartphones Launch This Week: या आठवड्यात भारतात लाँच Vivo, Realme चे नवे फोन्स, पहा यादी
आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीच्या घोषणेपूर्वी Motorola Edge 60 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लीकद्वारे उघड झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Motorola Edge 60 5G बद्दल अपेक्षित माहिती-
Motorola Edge 60 च्या लीकबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन मिलटरी ग्रेड MIL-810H प्रमाणपत्रासह सादर केला जाईल. याद्वारे फोन पडल्यास त्याचे संरक्षण होण्यास मदत होईल. एवढेच नाही तर, मोबाईलला वॉटरप्रूफ बनवण्यासाठी फोन IP68 + IP69 रेटिंगसह सादर केला जाऊ शकतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा मोबाईल मीडियाटेकच्या डायमेन्सिटी 7300 प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो. आगामी फोन 6.7 इंच लांबीच्या मोठ्या स्क्रीनसह लाँच केला जाईल, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह मिळू शकतो.
लीकनुसार, स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 12GB रॅमसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 12GB व्हर्च्युअल रॅम तंत्रज्ञान देखील असू शकते. जे मोबाईलच्या भौतिक रॅमसह एकत्रित केल्याने त्याला 24GB मिळेल. लीकनुसार, या फोनचा टॉप व्हेरिएंट 512GB इतका आहे.
याव्यतिरिक्त, लीकनुसार या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. लीकनुसार, त्याच्या बॅक पॅनलवर 50MP चा मुख्य कॅमेरा उपलब्ध असेल. हा सोनी LYTIA 700C सेन्सर असेल, जो OIS तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. त्याबरोबरच, हा फोन 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच केला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन बाजारात 5200mAh क्षमतेच्या पॉवरफुल बॅटरीने सुसज्ज असू शकतो, ज्यासह 68W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देखील दिले जाऊ शकते. मात्र, फोनचे फीचर्स लाँचनंतरच पुढे येतील.