Motorola Edge 60 Fusion first sale today in India with Huge Discount
Motorola ने अलीकडेच Motorola Edge 60 Fusion फोन भारतात लाँच केला आहे. आज म्हणजेच 9 एप्रिल रोजी या स्मार्टफोनची पहिली सेल सुरु होणार आहे. हा फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. या काळात स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सवलती आणि परवडणाऱ्या दरात EMI उपलब्ध असेल. तर, फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी आहे, जी जलद चार्जिंगसह सुसज्ज आहे. चला तर मग जाणून घेऊयात Motorola Edge 60 Fusion ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: Price Drop! लेटेस्ट Google Pixel 8 च्या किमतीत थेट 31,000 रुपयांची सूट, डील पुन्हा मिळणार नाही
Motorola Edge 60 Fusion फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या डिव्हाइसच्या 8GB+ 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. या हँडसेटचे टॉप मॉडेल म्हणजेच 12GB+ 256GB स्टोरेज व्हेरिएंट 24,999 रुपयांना उपलब्ध आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Axis आणि IDFC बँक क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास 2500 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, हँडसेटवर 1,127 रुपयांचा स्टॅंडर्ड EMI दिला जात आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Motorola Edge 60 Fusion मध्ये 6.7 इंच लांबीचा HD डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 1.5K आहे, रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी, या फोनवर गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन ग्लास बसवण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या मोबाईल फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 चिप आहे. या फोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले आहे. याव्यतिरिक्त, काम सोपे करण्यासाठी AI फीचर्स देखील उपलब्ध आहेत.
उत्तम फोटोग्राफीसाठी या हँडसेटमध्ये LED फ्लॅश लाईटसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP चा मुख्य सेन्सर आणि 13MP चा अल्ट्रा वाइड लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या हँडसेटमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही मोठी बॅटरी फक्त 9 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होईल, असा दावा कंपनीने केला आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.