Moto G04 Sale Offers: नव्याने लाँच झालेल्या स्मार्टफोनची पहिली सेल सुरु, Powerful फीचर्ससह किंमतही बघा। Tech News 

Moto G04 Sale Offers: नव्याने लाँच झालेल्या स्मार्टफोनची पहिली सेल सुरु, Powerful फीचर्ससह किंमतही बघा। Tech News 
HIGHLIGHTS

Moto G04 हा कंपनीचा नवीनतम स्मार्टफोन अलीकडेच लाँच झाला.

Moto G04 च्या 4GB + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये

UPI द्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल.

Motorola चा Moto G04 नवीनतम स्मार्टफोन अलीकडेच लाँच झालेला आहे. त्यानंतर आज म्हणजेच 22 फेब्रुवारीपासून हे उपकरण पहिल्यांदाच विक्रीसाठी Flipkart वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. पहिल्या सेलदरम्यान, या स्मार्टफोनवर तुम्हाला उत्तम ऑफर्स मिळतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, यात 128GB अंतर्गत स्टोरेजसह मिड-रेंज प्रोसेसर आहे. जाणून घ्या Moto G04 ची किंमत आणि पहिल्या सेलमधील ऑफर्स-

Moto G04 ची किंमत आणि ऑफर्स

कंपनीने Moto G04 च्या 4GB + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये निश्चित केली आहे. त्याबरोबरच, फोनचे 8GB + 128GB स्टोरेज मॉडेल 7,999 रुपयांना खरेदी करता येईल. वर सांगितल्याप्रमाणे, या स्मार्टफोनची पहिली सेल सुरु झाली आहे.

Motorola Moto G04
Motorola Moto G04

सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, UPI द्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल. याव्यतिरिक्त, 247 रुपयांच्या मासिक EMI वर Moto G04 देखील खरेदी करता येईल. Motorola चा नवीन स्मार्टफोन Moto G04 कॉन्कॉर्ड ब्लॅक, सॅटिन ब्लू, सी ग्रीन आणि सनराइज ऑरेंज या चार कलर ऑप्शन्समध्ये येतो. Buy From Here

Moto G04 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Moto G04 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. सुरळीत कामकाजासाठ, मोबाइल फोनमध्ये Unisoc T606 चिपसेट आणि 8GB RAM आहे. फोनमधील रॅमचा विस्तार देखील केला जाऊ शकतो. हा फोन 4GB + 64GB आणि 8GB + 128GB या दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा मोबाईल Android 14 OS वर कार्य करेल.

कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 16MP कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी या उपकरणाची बॅटरी 5000mAH आहे. यात 15W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. यात 4G, ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo