Affordable! नवा Moto G04 फोन भारतात 16GB रॅमसह भारतात लाँच, किंमत फक्त 6249 रुपये। Tech News 

HIGHLIGHTS

Motorola चा लेटेस्ट स्मार्टफोन Moto G04 अखेर भारतात लाँच

Moto G04 फोनची सुरुवातीची किंमत 6,249 रुपये ठेवली आहे.

फोनमध्ये 8GB व्हर्च्युअल रॅमसाठी देखील समर्थन आहे.

Affordable! नवा Moto G04 फोन भारतात 16GB रॅमसह भारतात लाँच, किंमत फक्त 6249 रुपये। Tech News 

मागील काही काळापासून चर्चेत असलेला Motorola चा लेटेस्ट स्मार्टफोन Moto G04 अखेर भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा नवीनतम एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा आहे. त्याबरोबरच, कंपनीचा दावा आहे की, हा फोन एका चार्जवर 102 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक देतो. ऑडिओसाठी, यात डॉल्बी ॲटमॉस वर्धित स्पीकर आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित सर्व तपशील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Moto G04 ची भारतीय किंमत

कंपनीने Moto G04 फोनची सुरुवातीची किंमत 6,249 रुपये ठेवली आहे. ही किंमत फोनच्या बेस्ट व्हेरिएंट म्हणजेच 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसाठी आहे. तर, फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या फोनमध्ये कॉन्कॉर्ड ब्लॅक, सॅटिन ब्लू, सी ग्रीन आणि सनराइज ऑरेंज या कलर ऑप्शन्सचा समावेश आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची विक्री 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता Flipkart आणि Motorola च्या साइटवर उपलब्ध होईल.

Motorola Moto G04
Motorola Moto G04

Moto G04 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Moto G04 फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश दर 90Hz आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॅमेरासाठी फोनमध्ये पंच-होल कटआउट आहे, जो डिस्प्लेच्या मध्यभागी स्थित आहे. हा फोन सुरळीत कामकाजासाठी Unisoc T606 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, ज्यामध्ये 4GB + 64GB आणि 8GB + 128GB स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहेत. फोनमध्ये 8GB व्हर्च्युअल रॅमसाठी देखील समर्थन आहे, ज्यासह फोनला 16GB पर्यंत रॅमचा सपोर्ट मिळेल.

फोटोग्राफीसाठी Moto G04 फोनमध्ये 16MP रियर कॅमेरा आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 15W चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे. हा फोन Android 14 वर कार्य करेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo