आगामी Moto G04 ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, AI कॅमेरासह मिळेल मजबूत बॅटरी। Tech News 

आगामी Moto G04 ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, AI कॅमेरासह मिळेल मजबूत बॅटरी। Tech News 
HIGHLIGHTS

आगामी स्मार्टफोन Moto G04 ची भारतीय लाँच डेट जाहीर

हा स्मार्टफोन 15 फेब्रुवारी 2024 रोजी लाँच केला जाईल.

मागील बाजूस LED लाईटसह 16MP AI सिंगल कॅमेरा मिळेल.

Motorola कंपनीने नवीन G-सिरीज मोबाईल फोन Moto G04 ची भारतीय लाँच डेट जाहीर केली आहे. या आगामी स्मार्टफोनची मायक्रोसाइट शॉपिंग वेबसाइट Flipkart वर लाईव्ह करण्यात आली आहे. यामुळे फोनच्या बहुतांश फिचर्सची माहिती देखील उघड झालेली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडेच कंपनीने Moto G24 Power स्मार्टफोन बजेट विभागात लाँच केला आहे. तर, आगामी स्मार्टफोनदेखील बजेट विभागात लाँच होणार, अशी अपेक्षा आहे.

लक्षात घ्या की, Moto G04 भारतापूर्वी जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे, जिथे त्याची किंमत 119 युरो म्हणजेच सुमारे 10,640 रुपये आहे. कंपनी या डिव्हाइसची किंमत 10 ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवण्याची शक्यता आहे.

Moto G04 चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स

वर सांगितल्याप्रमाणे, ऍक्टिव्ह मायक्रोसाइटनुसार आगामी स्मार्टफोन Moto G04 ची भारतीय लाँच डेट उघड झाली आहे. हा स्मार्टफोन 15 फेब्रुवारी 2024 रोजी लाँच केला जाईल. हा फोन ब्लॅक, ब्लु, डार्क ग्रीन आणि ऑरेंज या चार कलर ऑप्शन्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. तसेच, साईटनुसार स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह पंच-होल डिस्प्ले असेल, जो 6.6 इंच लांबीचा असेल. या स्मार्टफोनमध्ये UNISOC T606 प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज असेल. यात डॉल्बी ATMOS चाही सपोर्ट असेल. हा हँडसेट नवीनतम Android 14 वर काम करेल.

Moto G04 चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

Moto G04 चे काही अपेक्षित स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. त्यानुसार, Motorola च्या नवीन स्मार्टफोनच्या मागील बाजूस LED लाईटसह 16MP AI सिंगल कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात पोर्ट्रेट आणि ऑटो नाईट व्हिजनसाठी सपोर्ट आहे. त्याबरोबरच, सीमलेस कनेक्टिव्हिटीसाठी नवीन स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारख्या फीचर्ससह प्रदान केले जाईल.

Motorola Moto G04
Motorola Moto G04

बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Moto G04 मध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी दिली जाईल, जी 102 तासांचा म्युझिक प्लेबॅक टाइम, 22 तासांचा टॉक टाइम आणि 20 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक टाइम देईल. याव्यतिरिक्त, फोनमध्ये मोशन जेश्चर आणि सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा देखील असेल. मात्र लक्षात घ्या की, फोनची खरी किंमत आणि कन्फर्म फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लाँचनंतरच पुढे येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo