नवीन फोन लाँच होताच Moto Edge 30 च्या किमतीत घट, तब्बल 5,000 रुपयांनी स्वस्त

नवीन फोन लाँच होताच Moto Edge 30 च्या किमतीत घट, तब्बल 5,000 रुपयांनी स्वस्त
HIGHLIGHTS

Moto Edge 30 च्या किमतीत मोठी कपात

फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे.

नवीन किंमत कंपनीच्या साइटवर लाइव्ह

Motorola ने नुकताच Moto Edge 40 स्मार्टफोन लाँच केला आहे. लेटेस्ट स्मार्टफोन लाँच होताच त्याच्या मागील आवृत्तीची किमंत कमी करण्यात आली आहे. कंपनीने Moto Edge 30 स्मार्टफोन मागील वर्षी मे महिन्यात लाँच केला होता. नवीन Moto Edge 40 स्मार्टफोन 29,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. 

 Moto Edge 30 च्या किमतीत कपात 

कंपनीने मागील वर्षी Moto Edge 30 देखील 29,999 रुपये किमतीत लाँच केला होता. मात्र, आता या फोनची किंमत 5,000 रुपयांनी कमी झाली आहे. हा फोन आता केवळ 24,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही नवीन किंमत कंपनीच्या साइटवर लाइव्ह झाली आहे. 

 Moto Edge 30 चे स्पेक्स 

या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच लांबीचा फुल HD + OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. याशिवाय, फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778+ प्रोसेसरसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये 8GB रॅम + 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येते. 

फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यात प्रायमरी कॅमेरा 50MP, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. यात सेल्फीसाठी 32MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 4020mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo