प्रतीक्षा संपली ! Motorola Edge 40 अखेर भारतात लाँच, अवघ्या 10 मिनिटांत होणार चार्ज

प्रतीक्षा संपली ! Motorola Edge 40 अखेर भारतात लाँच, अवघ्या 10 मिनिटांत होणार चार्ज
HIGHLIGHTS

Motorola Edge 40 स्मार्टफोन भारतात लाँच

स्मार्टफोनमध्ये 4400mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 68W टर्बो पॉवरसह येते.

स्मार्टफोन Mediatek Dimensity 8020 प्रोसेसरसह येतो.

दीर्घ प्रतीक्षेनंतर Motorola Edge 40 स्मार्टफोन आज म्हणजेच 23 मे 2023 रोजी अखेर भारतात लाँच झाला. महत्त्वाचे म्हणजे लाँचसोबतच कंपनीने प्री-बुकिंगही सुरू केली आहे. लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून तुम्हाला स्मार्टफोनची प्री-बुकिंग करता येईल. हा जगातील सर्वात पातळ 5G स्मार्टफोन आहे, असा दावा देखील करण्यात येत आहे. नव्या फोनबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा. 

Motorola Edge 40 ची किंमत 

या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये आहे. तुम्ही फ्लिपकार्टवरून हा फोन मोफत बुक करू शकता. त्याची सेल 30 मे पासून सुरू होणार आहे. Motorola Edge 40 स्मार्टफोन Eclipse Black, Nebula Green आणि Lunar Black या तीन कलर ऑप्शन्समध्ये येतो. 

Motorola Edge 40 चे फीचर्स आणि स्पेक्स 

स्मार्टफोनमध्ये 6.55-इंच  लांबीची फुल HD+ स्क्रीन आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 3D कर्व डिस्प्ले आहे. फोनची पीक ब्राइटनेस 1200 निट्स आणि पिक्सेल रिझोल्यूशन 2400 x 1080 आहे. स्क्रीन HDR10+ सपोर्टसह येते. हा स्मार्टफोन Mediatek Dimensity 8020 प्रोसेसरसह येतो. डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन प्रीमियम व्हेगन लेदर फिनिश आणि मेटल फ्रेमसह येतो.  डिव्हाइस लॉक आणि अनलॉक करण्यासाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 

स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. फोनला पावर देण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 4400mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 68W टर्बो पॉवरसह येते. हा फोन 10 मिनिटांत चार्ज होतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हा फोन या विभागातील पहिला फोन आहे जो 15W वायरलेस चार्जिंगसह येतो. हा स्मार्टफोन Android 13 वर चालतो. 

कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP मुख्य कॅमेरा आणि मायक्रो व्हिजनसह 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 32MP देण्यात आला आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo