भारीच की ! 50MP कॅमेरासह Moto चा नवीन जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमतही कमी

Updated on 07-Oct-2022
HIGHLIGHTS

Motorola चा नवीन बजेट फोन Moto E32 भारतात लाँच

नवीनतम फोनची किमंत एकूण 10,499 रुपये

Moto E32 ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येईल.

स्मार्टफोन ब्रँड Motorola ने आपला नवीन बजेट फोन Moto E32 भारतात लाँच केला आहे. Moto E32 MediaTek Helio G37 प्रोसेसर आणि 90Hz रिफ्रेश रेटसह लॉन्च करण्यात आला आहे. फोन 50-मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन भारतापूर्वी युरोपियन मार्केटमध्ये सादर करण्यात आला होता.  चला जाणून घेऊया स्मार्टफोनच्या इतर स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबद्दल…

हे सुद्धा वाचा : Oscars : 'RRR' चित्रपट ऑस्कर रेसमध्ये सामील? निर्मात्यांनी सोशल मीडियावर केली घोषणा

Moto E32 चे स्पेसिफिकेशन्स

Moto E32 मध्ये 6.5-इंच लांबीचा HD+ LCD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोन MediaTek Helio G37 प्रोसेसरसह Android 12 ला सपोर्ट करतो. फोन 4 GB RAM सह 64 GB स्टोरेजला सपोर्ट करतो. Moto E32 चे स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येईल. 

फोनसोबत 5,000mAH बॅटरी उपलब्ध आहे, जी 10W चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, Moto E32 ड्युअल-बँड Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे. सिक्योरिटीसाठी साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. Moto E32 सह ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल आहे. सेकंडरी कॅमेराची डेप्थ 2 मेगापिक्सेल आहे आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto E32 ची  किंमत

फोनच्या 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेजची किंमत 10,499 रुपये आहे. Moto E32 ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येईल. हा फोन इको ब्लॅक आणि आर्क्टिक ब्लू कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :