LG G5 च्या किंमतीचा झाला खुलासा, प्री-बुकिंगही झाली सुरु

Updated on 01-Mar-2016
HIGHLIGHTS

ब्रिटेनच्या एक ऑनलाइन रिटेलर क्लोववर झालेल्या LG G5 स्मार्टफोनच्या लिस्टिंग नुसार, वॅटशिवाय ह्या स्मार्टफोनची किंमत जवळपास ४२ हजार (449.17 ब्रिटीश पाउंड) तर वॅटसह ह्याची किंमत जवळपास ५१,२७० (५३९ ब्रिटीश पाउंड) आहे. ह्या हँडसेटला अनलॉक विकले जाईल.

मोबाईल निर्माता कंपनी LG ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन G5 ला MWC 2016 मध्ये लाँच केले होते. तथापि लाँच वेळी कंपनीने ह्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिली नव्हची. मात्र आता अशी बातमी मिळत आहे की, ब्रिटेनमध्ये ह्या स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. ह्या यादीने फक्त फोनची प्री-बुकिंगच नाही तर फोनच्या किंमतीचाही खुलासा झाला आहे.

 

ब्रिटेनच्या एक ऑनलाइन रिटेलर क्लोववर झालेल्या LG G5 स्मार्टफोनच्या लिस्टिंग नुसार, वॅटशिवाय ह्या स्मार्टफोनची किंमत जवळपास ४२ हजार (449.17 ब्रिटीश  पाउंड) तर वॅटसह ह्याची किंमत जवळपास ५१,२७० (५३९ ब्रिटीश पाउंड) आहे. ह्या हँडसेटला अनलॉक विकले जाईल.

ह्याच्या लिस्टिंगमध्ये ह्या स्मार्टफोनच्या उपलब्धतेविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. हा हँडसेट एप्रिलमध्ये मिळणे सुरु होईल. तथापि, आतापर्यंत LG ने ह्याबाबत दुजोरा दिला नाही. ऑनलाइन रिटेलरमध्ये 32GB अंतर्गत स्टोरेजने LG G5 टायटन, सिल्वर आणि सोनेरी रंगात उपलब्ध आहे.

आता कंपनीने अशी माहिती दिली आहे की, पुढील तीन महिन्यात हा स्मार्टफोन  भारतात लाँच केला जाईल. ह्या समार्टफोनमध्ये आतापर्यंतचे सर्वात उत्कृष्ट असे क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर देण्यात आले आहे.

ह्या स्मार्टफोनच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनला एका खास डिझाईनसह लाँच केले आहे. ह्या स्मार्टफोनला मेटल बॉडीसह स्लीक डिझाईनसह बाजारात आणले आहे. त्याशिवाय ह्यात स्लाइड आउट रिमूव्हेबल बॅटरी दिली गेली आहे, ज्याने ह्या स्मार्टफोनच्या बॅटरीला एका स्लायडरप्रमाणे बाहेर काढू शकतो. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये १३५ डिग्री वाइड अँगल्स लेन्स दिले आहे, ज्याच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट फोटो काढू शकता.

 

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.3 इंचाची क्वाड-कोर HD IPS क्वांटम डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे पिक्सेल रिझोल्युशन 2560×1440/554ppi आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 4GB ची LPDDR4 रॅम दिली गेली आहे स्मार्टफोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो.

ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 16 मेगापिक्सेलचा रियर आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोसह बाजारात आणला आहे. ह्यात 2800mAh ची बॅटरी दिली गेली आहे. तसेच ह्यात LTE/3G/2G सपोर्टसुद्धा आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय 8/0.211/a/b/g/n/ac/USB टाइप-co (3.0 compatible) सह NFC, ब्लुटूथ ४.२ दिला गेला आहे.

हेदेखील वाचा – LG G5 : 4GB रॅमने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन लवरकच होणार भारतात लाँच

हेदेखील वाचा – अॅप्पल आयपॅड मिनी (16GB) आणि सॅमसंग गॅलेक्सी टॅब A 8.0 यांच्यात नेमका फरक काय?

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :