लिनोवो K3 नोट नंतर आता लिनोवो A2010 4G चीही सुरु झाली खुली विक्री

Updated on 25-Jul-2022
HIGHLIGHTS

लिनोवोच्या स्मार्टफोन A2010 4G ला आता आपण कोणत्याही नोंदणीशिवाय अगदी सहजरित्या खुल्या विक्रीच्या माध्यमातून घेऊ शकता.

लिनोवोने आपल्या बजेट स्मार्टफोन A2010 4G साठी खुल्या विक्रीचे आयोजन केले आहे. हा स्मार्टफोन केवळ ४,९९९ रुपयांत आपण खरेदी करु शकता.  हा आपल्या बजेटमध्ये येणारा, चांगली वैशिष्ट्ये असलेला ४जी फोन आहे. ह्या स्मार्टफोनसाठी सोमवारी म्हणजेच ७ सप्टेंबरपासून दुपारी १२ वाजल्यापासून खुली विक्री सुरु झाली आहे. ह्या स्मार्टफोनला आपण आपल्या बजेटमध्ये फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी करु शकता. ह्या खुल्या विक्रीत हा स्मार्टफोन पांढरा आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.

ह्या स्मार्टफोनला ४.५ इंचाची ८५४X४८० डिस्प्ले दिली गेली आहे. त्यासोबत ह्यात LED फ्लॅश सह ५ मेगापिक्सेल रियर आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे.  लिनोवो A2010मध्ये मीडियाटेकचा MT6735M 64 बिट प्रोसेसर १GHz क्वाड कोर CPU आणि mali-T720 GPU सोबत दिला गेला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये १जीबी रॅमसुद्धा दिली गेली आहे. त्यासोबत तो ड्युल सिमला सुद्धा सपोर्ट करतो. आणि ह्यात २०००mAh क्षमता असलेली मोठी बॅटरी दिली गेली आहे. लिनोवो A2010 सर्वात स्वस्त ४जी होण्यासोबत अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर चालतो. ह्याचे वजन निव्वळ १३७ ग्रॅम आहे.

लिनोवोने हल्लीच आपला नवीन स्मार्टफोन Zuk Z1 चीनमध्ये लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत CNY 1,799 (जवळपास १८,२५० रुपये) आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये धातूफ्रेम दिली गेली आहे. Zuk ब्रँड नावाचा लाँच झालेला लिनोवोचा पहिला स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनला कंपनी चीनच्या बाहेर लाँच करण्याच्या विचारात आहे. ह्या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये पाहिली असता ह्याला ५.५ इंचाची पुर्ण एचडी डिस्प्ले (१०८०X१९२०p) दिली गेली आहे. तसेच ह्याच्या पुढील पॅनलवर एक फिजिकल होम बटण सुद्धा दिले आहे. ह्या होम बटणमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिले गेले आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये २.५GHz क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन ८०१ प्रोसेसरसोबत ३जीबी रॅमही देण्यात आले आहे. ह्यात एड्रेनो ३३० GPU दिला गेला आहे. जर ह्याच्या सिम्सबद्दल बोलायचे झाले तर, स्मार्टफोनमध्ये ड्युल नॅनो सिमकार्ड्ससाठी २ स्लॉट दिले गेले आहेत. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉपवर चालतो आणि ह्यात ६४जीबी इनबिल्ट स्टोरेज दिली गेली आहे.

 

फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेल रियर कॅमेरा सोनी सेंसर (IMX214) आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनसह दिला गेला आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. त्यासोबतच ह्यात ४१००mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे. हा स्मार्टफोन आपल्याला पांढरा आणि राखाडी रंगात मिळू शकतो.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover.

Connect On :