Lava Yuva 2 5G VS Redmi A4 5G which phone is best check aomparison
Lava Yuva 2 5G: देशी स्मार्टफोन निर्माता Lava आपला नवा Lava Yuva 2 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने बजेट श्रेणीमध्ये लाँच केला आहे. युवा सिरीजच्या नवीनतम स्मार्टफोनमध्ये मोठ्या डिस्प्लेसह पॉवरफुल प्रोसेसर आणि दीर्घकाळ चालणारी बॅटरी आहे. लावाच्या फोनचे डिझाईनही खास आहे. कॅमेऱ्याच्या मागील बाजूस एक नोटिफिकेशन लाईट देखील आहे.
एवढेच नाही तर, जेव्हा तुम्ही ॲप आणि सिस्टम सूचना, कॉल इ. प्राप्त करता तेव्हा हा प्रकाश उजळेल. या फीचरसह येणारा सेगमेंटमधील हा पहिला फोन आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Lava Yuva 2 5G फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
Lava Yuva 2 5G स्मार्टफोन भारतात 9,499 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मार्बल ब्लॅक आणि मार्बल व्हाईट या दोन कलर ऑप्शन्समध्ये समाविष्ट आहे. उपलब्धतेबद्दल हा फोन सध्या भारतातील रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल. तुम्ही वरील पोस्टमध्ये इतर माहिती पाहू शकता.
Lava Yuva 2 5G फोनमध्ये 4GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. त्याबरोबरच, फोनमध्ये 4GB व्हर्चुअल रॅमचा पर्यायही उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Lava च्या या नवीन 5G स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर 6nm UNISOC T760 प्रोसेसर देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा हँडसेट 5000mAh बॅटरीसह येतो. यात 18W चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP रियर कॅमेरा आणि 2MP AI कॅमेरा आहे. तर, फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅश देखील देण्यात आला आहे. तसेच आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. यात प्रोटेक्शनसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.