जगातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Amazonवर खरेदीसाठी उपलब्ध, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Updated on 16-Nov-2022
HIGHLIGHTS

LAVA BLAZE 5G स्मार्टफोन AMAZON वर खरेदीसाठी उपलब्ध

हा जगातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन होय.

फोनची किंमत 10,999 रुपयांना खरेदी करता येईल.

LAVA ने भारतीय ग्राहकांसाठी Blaze 5G स्मार्टफोन सादर केला. जवळपास एक महिन्यानंतर ब्रँडने अखेर देशात स्मार्टफोनची उपलब्धता उघड केली आहे. ब्रँडच्या अधिकृत हँडलने केलेल्या एका ट्विटर पोस्टनुसार, Lava Blaze 5G 15 नोव्हेंबरपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्यानुसार हा स्मार्टफोन 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:00 वाजता Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. 

हे सुद्धा वाचा : iPhone लव्हर्स ! iPhone SE 4 बद्दल समोर आली मोठी माहिती, पहा कधी लाँच होणार 5G फोन…

Lava Blaze 5G ची किंमत :

 Lava Blaze 5G 4GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट Amazon इंडिया वर 10,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन ग्लास ग्रीन कलरमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. येथून खरेदी करा… 

LAVA BLAZE 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Lava Blaze 5Gमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि वॉटरड्रॉप नॉचसह 6.5-इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे. पॉवर बटणमध्ये साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. मागील पॅनलवरील कॅमेरा मॉड्यूलमध्ये 50MP मेन सेन्सर, एक डेप्थ लेन्स आणि मॅक्रो युनिट आहे. स्मार्टफोनच्या समोर आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 8MP सेल्फी कॅमेरा आहे. डिव्हाइसवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल सिम, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.1, GPS, एक USB टाइप-C पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक समाविष्ट आहे. 

Lava Blaze 5G डायमेन्सिटी 700 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, जो आठ 5G बँडपर्यंत सपोर्ट करतो. यात 4GB RAM, 3GB व्हर्च्युअल रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह समर्पित मायक्रो SD कार्ड स्लॉट आहे. स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमसह प्री-इंस्टॉल केलेला आहे. यात 5,000mAh बॅटरी युनिट आहे. हा स्मार्टफोन ग्लास ब्लू आणि ग्लास ग्रीन कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :