#Vivo Y58 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चे अधिकांश स्मार्टफोन सध्या इ-कॉमर्स साईट्सवर मोठ्या सवलतींसह खरेदीसाठी उपलब्ध आहेत. जर तुम्हाला देखील 20,000 रुपयांअंतर्गत नवीन Vivo स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल तर, Vivo Y58 5G फोन भारी सवलतींसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. या फोनमध्ये तुम्हाला या किमतीत मोठी बॅटरी आणि अप्रतिम कॅमेरा स्पेक्स मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात Vivo Y58 5G ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Also Read: 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल Samsung Galaxy F05, जाणून घ्या Best ऑफर्स
Vivo Y58 5G स्मार्टफोनची किंमत 17,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1000 रुपयांची त्वरित सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, Vivo Y58 5G स्मार्टफोन सध्या Amazon वरून 848 रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी करता येईल. लक्षात घ्या की, हा स्मार्टफोन सुंदरबन ग्रीन आणि हिमालयन ब्लू या कलर ऑप्शन्समध्ये मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Vivo Y58 5G स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच लांबीचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. या स्मार्टफोनला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षिततेसाठी IP64 रेटिंग मिळाले आहे. स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 44W फ्लॅशचार्जला सपोर्ट करेल.
फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा दुसरा सेन्सर उपलब्ध आहे. फोनच्या मागील बाजूस फ्लॅश देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP कॅमेरा आहे. तर, चांगल्या फोटोग्राफीसाठी फोनमध्ये नाईट, पोर्ट्रेट, ड्युअल व्ह्यू, लाईव्ह फोटो, स्लो-मोशन आणि डॉक्युमेंट्स सारखे अनेक कॅमेरा फीचर्स उपलब्ध आहेत. फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.