Vivo T4x 5G Sale: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात आपला नवा फोन Vivo T4x 5G सादर करण्यात आला आहे. त्यानांतर, आज म्हणजेच 12 मार्च रोजी, या स्मार्टफोनची पहिला सेल आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart वर ही सेल लाईव्ह असणार आहे. पहिल्या सेलमध्ये या फोनवर बँक ऑफर्स, EMI इ. ऑफर्सचा लाभ मिळणार आहे. जाणून घेऊयात Vivo T4x 5G वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स-
Also Read: Finally! गेमिंग लव्हर्ससाठी iQOO Neo 10R फोन अखेर भारतात लाँच, गेमिंगदरम्यान तासनतास टिकेल बॅटरी
प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर Vivo T4x 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. Vivo T4x 5G फोनच्या 6GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये इतकी आहे. तर, फोनच्या 8GB+ 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये इतकी आहे. पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Axis, HDFC आणि SBI बँक यावर 1000 रुपयांची सूट देत आहे. फोनवर 686 रुपयांचा EMI देखील उपलब्ध आहे. हा फोन प्रोंटो पर्पल आणि मरीन ब्लू कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Vivo T4x 5G फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्मूथ परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये सुरक्षेसाठी यात फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट आहे, ज्यामध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळेल.
फोटोग्राफीसाठी या Vivo स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅश लाईट आणि रिंग लाईटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP प्राथमिक लेन्स आणि दुसरा 2MP सेन्सर आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाइसच्या पुढील बाजूस 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6500mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, हँडसेटमध्ये वाय-फाय, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट आहे.