Vivo Smartphones under 25000: अनेक पॉवरफुल फीचर्ससह येतात टॉप 5G स्मार्टफोन्स, पहा यादी 

Vivo Smartphones under 25000: अनेक पॉवरफुल फीचर्ससह येतात टॉप 5G स्मार्टफोन्स, पहा यादी 
HIGHLIGHTS

Vivo ने अलीकडेच परवडणाऱ्या किमतीत अनेक 5G स्मार्टफोन सादर केले आहेत.

Vivo चे 25,000 रुपयांअंतर्गत येणारे सर्वोत्तम 5G स्मार्टफोन्स

Vivo च्या V आणि T सिरीजचे स्मार्टफोन्स मिड-बजेट रेंजमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय

Vivo Smartphones under 25000: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच परवडणाऱ्या किमतीत अनेक 5G स्मार्टफोन सादर केले आहेत. अनेक किफायतशीर स्मार्टफोन्ससह पॉवरफुल फीचर्स देण्यासाठी Vivo कंपनी सध्या शीर्षस्थानी आहे. Vivo च्या V आणि T सिरीजचे स्मार्टफोन्स मिड बजेट रेंजमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Vivo च्या 25,000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत. काही सर्वोत्तम 5G स्मार्टफोन्सची यादी आम्ही तयार केली आहे. पहा यादी-

Also Read: लेटेस्ट Vivo T3 Pro 5G ला Discount सह खरेदी करण्याची संधी, 50MP कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स

Vivo T3 Pro 5G

vivo t3 pro 5g

Vivo T3 Pro 5G स्मार्टफोन कंपनीने अलीकडेच भारतात लाँच केला आहे. या फोनची किंमत 22,999 रुपयांच्या बजेटमध्ये आहे. Vivo T3 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.77-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. यामध्ये 5500mAh बॅटरी उपलब्ध आहे.

Vivo Y300 5G

Latest Vivo Y300 5G gets big discount on Amazon check top 5 feature

Vivo Y300 5G स्मार्टफोन कंपनीचा एक भारी स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 21,999 रुपयांच्या बजेटमध्ये आहे. 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी रिअर कॅमेरा आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. तर, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

Vivo V30e 5G

Vivo V30e
Vivo V30e

Vivo V30e 5G स्मार्टफोन कंपनीचा आकर्षक डिझाईनसह येणाऱ्या स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत देखील 22,999 रुपयांच्या बजेटमध्ये आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V30e स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीचा फुलएचडी+ कर्व AMOLED स्क्रीन आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हे डिव्हाइस ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी, Vivo V30 फोनमध्ये 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 50MP चा वाइड अँगल कॅमेरा आहे. यात 50MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

Vivo Y300 Plus

Vivo Y300 Plus 5G
Vivo Y300 Plus 5G

Vivo Y300 Plus स्मार्टफोन कंपनीने अलीकडेच भारतात सादर केला आहे. या फोनची किंमत देखील 23,999 रुपयांच्या बजेटमध्ये आहे. Vivo Y300 स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच लांबीचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले असेल. तर, चांगल्या परफॉर्मन्ससाठी, हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेटने सुसज्ज असेल. कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा सेन्सर दिला जाईल. तसेच, 8MP चा वाइड अँगल लेन्स दिला जाईल. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. लक्षात घ्या की, वरील सर्व स्मार्टफोन्स तुम्हाला प्रसिद्ध इ-कॉमर्स साईटवरून खरेदी करता येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo