लेटेस्ट Vivo T3 Pro 5G ला Discount सह खरेदी करण्याची संधी, 50MP कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स  

HIGHLIGHTS

एक Vivo T3 Pro 5G स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात डिस्काउंटसह खरेदीसाठी उपलब्ध

Vivo T3 Pro 5G स्मार्टफोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वरून खरेदी करता येईल.

Vivo T3 Pro 5G फोनच्या कॅमेरा सेक्शनमध्ये LED फ्लॅश लाईटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

लेटेस्ट Vivo T3 Pro 5G ला Discount सह खरेदी करण्याची संधी, 50MP कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स  

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या Vivo T सिरीजमध्ये अनेक उत्तम स्मार्टफोन्स मॉडेल्स समाविष्ट आहेत. त्यापैकी एक Vivo T3 Pro 5G स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात डिस्काउंटसह खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वरून खरेदी करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vivo T3 Pro 5G कंपनीने 25,000 रुपयांअंतर्गत सादर केला आहे. जाणून घेऊयात Vivo T3 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Upcoming Smartphone: लोकप्रिय Honor च्या आगामी स्मार्टफोनसाठी सज्ज व्हा! Amazon वर दिसली पहिली झलक

Vivo T3 Pro 5G confirmed to launch tomorrow in India

Vivo T3 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स

Vivo T3 Pro 5G फोन Flipkart वर मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहे. या फोनचा 8GB+ 256GB स्टोरेज मॉडेल 24,999 रुपयांना खरेदी करता येईल. या मोबाईल फोनचा 8GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोणत्याही बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास फोनवर 2000 रुपयांची सूट मिळेल. तसेच, या फोनवर 1,127 रुपयांचा EMI उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, या फोनवर 22,400 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. येथून खरेदी करा

Vivo T3 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Vivo च्या स्मार्टफोनमध्ये 6.77 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Qualcomm चा Snapdragon 7 Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. या प्रोसेसरद्वारे सुधारित कामगिरी, वाढीव उर्जा कार्यक्षमता आणि सुधारित AI क्षमता मिळेल, ज्यामुळे ते डिमांडिंग अप्लिकेशन्ससाठी आणि गेमिंगसाठी अधिक योग्य आहे. सुरक्षेसाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.

vivo t3 pro 5g
vivo t3 pro 5g

फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या कॅमेरा सेक्शनमध्ये LED फ्लॅश लाईटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP चा प्रायमरी आणि 8MP चा सेकंडरी लेन्स आहे. याद्वारे भारी स्नॅपशॉट घेता येईल, अल्ट्रा HD दस्तऐवज घेता येईल आणि स्लो-मोशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल. फोनच्या पुढील बाजूस सेल्फीसाठी 16MP कॅमेरा आहे. यात Photo, Portrait, Video, Dual View, Live PhotoRear: Photo, Portrait, Night, Snapshot, Video, Pano, Ultra HD Document, Slow-mo आणि Time-lapse सारखी फीचर्स मिळतील. पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo