Smartphones launched in October 2023: Google पासून ते OnePlus पर्यंत टॉप ब्रँड्सचे ‘8’ जबरदस्त स्मार्टफोन्स भारतात लाँच, बघा यादी 

Smartphones launched in October 2023: Google पासून ते OnePlus पर्यंत टॉप ब्रँड्सचे ‘8’ जबरदस्त स्मार्टफोन्स भारतात लाँच, बघा यादी 
HIGHLIGHTS

गेल्या महिना म्हणेजच ऑक्टोबर महिना स्मार्टफोन लाँचसाठी खूप खास होता.

Google Pixel 8 सिरीजपासून ते OnePlus चा पहिला फोल्डेबल फोन OnePlus Open पर्यंत अनेक फोन लाँच झाले आहेत.

यासह, आणखी फोल्डेबल फोन्स देखील लाँच करण्यात आले आहेत.

2023 या वर्षाची शेवटची तिमाही सुरु आहे. हा वर्ष संपायला अवघे दोन महिने उरले आहेत. या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात अनेक जबरदस्त Smartphones लाँच होणार आहेत. तर, गेल्या महिना म्हणेजच ऑक्टोबर महिना स्मार्टफोन लाँचसाठी खूप खास होता. या महिन्यात, Google Pixel 8 सिरीजपासून ते OnePlus चा पहिला फोल्डेबल फोन OnePlus Open पर्यंत अनेक फोन लाँच करण्यात आले. ज्याची आम्ही संपूर्ण यादी तयार केली आहे. बघा यादी

Google Pixel 8 सिरीज

Google Pixel 8 Series Sale
Google Pixel 8 Series

Google Pixel 8 सिरीजमध्ये Google Pixel 8 आणि Google Pixel 8 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले होते. Google Pixel 8 स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 75,999 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी आहे. या फोनमध्ये 6.2 इंच डिस्प्ले, Google Tensor G3 प्रोसेसर, 50MP कॅमेरा यांसारखी फीचर्स आहेत.

तर, Google Pixel 8 Pro स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 1,06,999 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 12GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी आहे. या फोनमध्ये 6.7 इंच डिस्प्ले, Google Tensor G3 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5050mAh बॅटरी यांसारखी फीचर्स आहेत.

Vivo 29 सिरीज

Vivo V29 सिरीजमध्ये Vivo V29 आणि Vivo V29 Pro स्मार्टफोन्स समाविष्ट आहेत. Vivo V29 स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 32,999 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी आहे. या फोनमध्ये 6.78 इंच डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 4600mAh बॅटरी इ. फीचर्स आहेत.

vivo v29 smartphone series
Vivo v29 Series

तर, Vivo V29 Pro स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसाठी आहे. या फोनमध्ये 6.78 इंच डिस्प्ले, MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 4600mAh बॅटरी इ. फीचर्स आहेत.

OnePlus Open

oneplus open

OnePlus ने आपला पहिला-वहिला फोल्डेबल फोन OnePlus Open लाँच केला आहे. OnePlus Open फोनची किंमत 1,39,999 रुपये आहे. फोनमध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. फोनमध्ये 7.82-इंच लांबीचा मेन आणि 6.31-इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 4,800mAh बॅटरी आहे.

Tecno Phantom V Flip

Tecno Phantom V Flip फोनची किंमत 49,999 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलसाठी आहे. फोनमध्ये 6.90 इंच डिस्प्ले, MediaTek Dimensity 8050 प्रोसेसर, 64MP कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी आहे.

Oppo Find N3 Flip

oppo find n3 flip

या फ्लिप फोनची किंमत 94,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.8-इंच लांबीचा मुख्य आणि 3.26-इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले, MediaTek Dimensity 9200 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 4,300mAh बॅटरी आहे.

Samsung Galaxy S23 FE

Samsung Galaxy S23 FE
Samsung Galaxy S23 FE

Samsung Galaxy S23 FE फोनची किंमत 59,999 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलसाठी आहे. या फोनमध्ये 6.40 इंच डिस्प्ले, ऑक्टा-कोर चिपसेट, 50MP कॅमेरा आणि 4,500mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo