Samsung Galaxy S25 Ultra
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने नुकतेच म्हणजेच 22 जानेवारी रोजी Samsung Galaxy S25 सिरीज टेक विश्वात दाखल केली आहे. त्यानंतर, आज 3 फेब्रूवारी रोजी सिरीजमधील लेटेस्ट Samsung Galaxy S25 Ultra फोनची सेल भारतीय बाजारात सुरु झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन Samsung ची अधिकृत साईट आणि Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या सेलदरम्यान या महागड्या स्मार्टफोनवर हजारो रुपयांची बचत करता येईल. जाणून घेऊयात Samsung Galaxy S25 Ultra वरील ऑफर्स-
Also Read: Samsung TV Deals: 65 इंचपर्यंत स्मार्ट टीव्हीच्या किमतीत मोठी घसरण, अजिबात चुकवू नका ‘या’ डील्स
Samsung Galaxy S25 Ultra तीन वेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये, पहिला 12GB+256GB स्टोरेज, दुसरा 12GB+512GB आणि तीसरा 12GB+ 1TB स्टोरेज व्हेरिएंट आहे. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 12GB+256GB ची किंमत 1,11,999 12GB+512GB ची किंमत 1,29,999 रुपये आणि 12GB+ 1TB स्टोरेजची किंमत 1,65,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
Amazon India वर सूचीबद्ध असलेल्या ऑफर्सनुसार, या फोनची किंमत Amazon वर 1,41,999 रुपये इतकी आहे. मात्र, हा फोन 1,29,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. पहिल्या सेलदरम्यान Samsung Galaxy S25 Ultra वर अनेक चांगल्या बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. होय, HDFC बँके कार्ड वापरून वापरकर्ते 8,000 हजार रुपयांची इन्स्टंट सूट मिळवू शकतात. अशाप्रकारे, तुम्हाला हा फोन Amazon वर 20,000 रुपयांच्या सवलतीसह मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Samsung Galaxy S25 Ultra मध्ये 6.9-इंच लांबीचा डायनॅमिक AMOLED 2X स्क्रीन आहे. या स्क्रीन प्रोटेक्शन कॉर्निंग गोरिल्ला आर्मर प्रोटेक्शन आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Samsung चा हा हँडसेट स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरसह येतो. Samsung Galaxy S25 Ultra मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 200MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. त्यातील तिसरा कॅमेरा 50MP चा टेलिफोटो आणि चौथा कॅमेरा 10MP चा आहे. यात सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 12MP चा सेल्फी कॅमेरा आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली गेली आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.