आगामी Realme GT 7 सिरीज लवकरच भारतात लाँच होणार! जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि सर्व तपशील 

HIGHLIGHTS

Realme GT 7 सिरीज लवकरच भारतात लाँच होण्यासाठी सज्ज

या लाइनअप अंतर्गत Realme GT 7 आणि Realme GT 7T सादर केले जातील.

आगामी Realme GT 7 सिरीजच्या अपेक्षित किमतीबद्दल माहिती

आगामी Realme GT 7 सिरीज लवकरच भारतात लाँच होणार! जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि सर्व तपशील 

भारतात Realme GT 7 सिरीजच्या लाँचिंगची घोषणा करण्यात आली आहे. या लाइनअप अंतर्गत Realme GT 7 आणि Realme GT 7T बाजारात लाँच केले जाऊ शकतात. या दोन्ही फोनबद्दल अनेक लीक सोशल मीडियावर पुढे येत आहेत. दरम्यान, ताज्या लीकमध्ये या दोन्ही आगामी स्मार्टफोन्सच्या किमतीची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. या हँडसेटचे काही फीचर्स देखील समोर आले आहेत. जाणून घेऊयात किंमत आणि अपेक्षित तपशील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Price Drop! Amazon Sale मध्ये फ्लिप स्मार्टफोन्सच्या किमतीत घसरण, पहा जबरदस्त ऑफर्स

Realme GT 7 लवकरच होणार लाँच

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Realme नुसार Realme GT 7 सिरीज लवकरच भारतीय बाजारात सादर केली जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, सोशल मीडिया हँडलवर #2025FlagshipKiller या हॅशटॅगसह या लाइनअपची माहिती दिली जाऊ शकते. मात्र, या लाइनअपमध्ये येणाऱ्या फोनबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही किंवा लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही.

realme gt 7

Realme ने अद्याप Realme GT 7 सिरीजच्या किंमतीशी संबंधित कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु अलिकडच्या लीक्सनुसार या सिरीजची सुरुवातीची किंमत 34 हजार रुपये इतकी असू शकते. या फोनच्या आगमनाने Xiaomi सारख्या ब्रँडना जोरदार स्पर्धा मिळेल.

Realme GT 7 अपेक्षित तपशील

लीक मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तम परफॉर्मन्ससाठी Realme GT 7 फोनमध्ये MediaTek Dimensity 9300 Plus चिपसेट दिली जाऊ शकते. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB RAM दिली जाऊ शकते. हा फोन अँड्रॉइड 15 वर कार्य करेल.

मात्र, सिरीजमधील दुसऱ्या डिव्हाइस, GT 7T मध्ये Dimensity 8400 चिप, 8 GB RAM आणि 120 W फास्ट चार्जिंग दिले जाऊ शकते. तसेच, दोन्हीमध्ये ड्युअल सिम, वायफाय, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी स्पेक्स मिळतील. मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, Realme GT 7 फोनचे किंमत आणि फीचर्स फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo