Realme C75 5G with 6000mAh Launched
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने Realme C75 5G स्मार्टफोन भारतात शांतपणे लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीच्या C सिरीजची ही नवीनतम आवृत्ती आहे. हा नवा स्मार्टफोन बजेट किमतीत सादर करण्यात आला आहे. फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Realme च्या फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. तसेच, फोनची बॅटरी 6000mAh आहे, ज्यामध्ये फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme C75 5G ची किंमत आणि सर्व तपशील-
Also Read: iQOO Neo 10 चे भारतीय लाँच कन्फर्म! आगामी स्मार्टफोन पॉवर पॅक्ड फीचर्ससह सुसज्ज
Realme कंपनीने Realme C75 5G फोनची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. ही किंमत फोनच्या 4GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. त्याच वेळी, 6GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. या फोनमध्ये लिली व्हाइट, मिडनाईट लिली आणि पर्पल ब्लॉसम हे तीन कलर ऑप्शन्स सादर करण्यात आले आहेत. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री Realme India आणि Flipkart वर सुरू झाली आहे.
लेटेस्ट Realme C75 5G फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आहे. यात 4GB RAM आणि 6GB RAM चे पर्याय आहेत. त्याबरोबरच, या फोनमध्ये 128GB स्टोरेज आहे, जे मायक्रो SD कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येते.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Realme C75 5G फोनमध्ये 32MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. हा फोन अँड्रॉइड 14 आधारित realme UI 5.0 वर कार्य करतो. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.