POCO M7 5G
Poco M7 5G Sale: अलीकडेच प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Poco ने नुकतेच भारतात POCO M7 5G स्मार्टफोन लाँच केला. या स्मार्टफोनची आज भारतात पहिली सेल आहे. नुकताच लाँच झालेला हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. या किमतीत फोनमध्ये अनेक पॉवरफुल फीचर्स दिले जातात. पहिल्या सेलमध्ये डिस्काउंटसह हा फोन खरेदी करण्याची संधी आहे. चला तर मग जाणून घेऊयात Poco M7 5G फोनची किंमत आणि विक्री ऑफर्स-
Also Read: भारीच की! लेटेस्ट Nothing Phone (3a) सिरीजवर होईल हजारो रुपयांची बचत, पहा खात्रीची ऑफर
लेटेस्ट Poco फोनची पहिली सेल आज म्हणजेच 7 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा स्मार्टफोन प्रसिद्ध इ- कॉमर्स साईट Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. पहिल्या सेलमध्ये 6GB+ 128GB हा फोन 9,999 रुपयांना विशेष लाँच ऑफरमध्ये उपलब्ध असेल. फोनच्या 8GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. हा फोन ब्लॅक, ब्लु आणि ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
नवीनतम Poco M7 5G या फोनमध्ये 6.88 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, त्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्मूथ परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 हा बजेट-फ्रेंडली स्मार्टफोनसाठी एक उत्तम प्रोसेसर मानला जातो. जो ब्राउझिंग, सोशल मीडिया आणि लाईट गेमिंग सारख्या दैनंदिन कामांसाठी सुरळीत कामगिरी देतो. याद्वारे चांगली पॉवर कार्यक्षमता आणि 5G कनेक्टिव्हिटी सारख्या आधुनिक फीचर्ससाठी समर्थन देखील आहे.
हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित हायपर OS वर काम करतो. या हँडसेटमध्ये फेस अनलॉकसह फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. तर, पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी या फोनला IP52 रेटिंग देखील मिळाले आहे. त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 50MP कॅमेरा आणि सेल्फीसाठी समोर 8MP फ्रंट कॅमेरा मिळेल. तर, पॉवर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5160mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. स्मार्टफोनमध्ये चार्जिंगसाठी USB टाइप-सी पोर्ट आहे. हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.