Oppo A5 Pro 5G launched in India starting at Rs 17999
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने Oppo A5 Pro 5G फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा चिनी डिव्हाइस निर्मात्याचा एक नवीन स्मार्टफोन आहे. हा फोन सर्वसामान्यांना लक्ष्य करून बनवला आहे, असे सांगण्यात आले आहे. OPPO ने म्हटले आहे की, हे डिव्हाइस IP69, IP68 आणि IP66 प्रमाणपत्रासह येते.
खरं तर, OPPO ने हे डिव्हाइस ग्लव्स घालणाऱ्या रायडर्ससाठी योग्य असे बनवले आहे. OPPO A5 Pro मध्ये आउटडोअर आणि ग्लोव्ह मोड सपोर्ट देखील आहे. त्यामुळे तुमच्या बोट ग्लव्सने झाकलेले असतानाही तुम्ही डिव्हाइसच्या डिस्प्लेचा वापर करू शकता.
Also Read: Important! लेटेस्ट Vivo V50e का खरेदी करावा? ‘या’ 7 पॉईंट्ससह जाणून घ्या सविस्तर माहिती
OPPO A5 Pro 5G भारतात दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 8GB+128GB ची किंमत 17,999 रुपये इतकी आहे. त्याबरोबरच, या फोनच्या 8GB+256GB ची किंमत 19,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हा फोन दोन फेदर ब्लू आणि मोचा ब्राउन कलर ऑप्शन्ससह लाँच करण्यात आला आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI, BOB Financial, IDFC First Bank सारख्या आघाडीच्या बँकांमध्ये वापरकर्त्यांना 1,500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे डिव्हाइस Amazon, Flipkart आणि OPPO इंडियाच्या ई-स्टोअर सारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.
OPPO A5 Pro 5G च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला मोठा डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंग उत्तम परफॉर्मन्ससाठी, हे डिव्हाइस MediaTek Dimensity 6300 SoC द्वारे समर्थित आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB पर्यंत RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज आहे. फोनमध्ये AI टूलबॉक्ससह अनेक AI फीचर्सचे देखील सपोर्ट आहे.
एवढेच नाही तर, अधिक चांगल्या आणि स्मूथ गेमिंग एक्सपेरियन्ससाठी, OPPO ने डिव्हाइसमध्ये ग्रेफाइट आणि थर्मल जेल देखील समाविष्ट केले आहे. यामुळे तुमचा फोन दीर्घ गेमिंग सत्रांमध्ये शक्य तितका थंड राहील, याची खात्री असेल. पॉवर बॅकअपसाठी, या डिव्हाइसमध्ये 45W जलद चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5800mAh ची मोठी बॅटरी आहे. कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP पोर्ट्रेट कॅमेरासह ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी डिव्हाइसमध्ये 8MP सेल्फी सेन्सर देखील आहे.