लेटेस्ट Lava Yuva Smart फोन पॉवरफुल फीचर्ससह भारतात लाँच, प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे किंमत
Lava ने आपला नवीन Lava Yuva Smart नुकतेच भारतात लाँच केला आहे.
Lava Yuva Smart स्मार्टफोनची किंमत 6000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी, डिव्हाइसमध्ये 13MP प्राथमिक आणि AI लेन्स आहे.
भारतातील प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Lava ने आपला नवीन Lava Yuva Smart नुकतेच भारतात लाँच केला आहे. हा Yuva सिरीजमधील नवीन स्मार्टफोन आहे, जो बजेट श्रेणीत लाँच करण्यात आला आहे. Lava Yuva Smart फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन कमी किमतीत अनेक उत्तम फीचर्स ऑफर करतो. हा मोबाइल फोन AI कॅमेरा, HDR आणि पोर्ट्रेट मोड सारख्या सुविधांनी सुसज्ज आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Lava Yuva Smart फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
SurveyAlso Read: Price Drop! लोकप्रिय आणि स्वस्त Vivo फोनवर मिळतोय तब्बल 4000 रुपयांचा Discount, पहा ऑफर्स

Lava Yuva Smart ची किंमत
Lava कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Lava Yuva Smart स्मार्टफोनची किंमत 6000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा फोन ग्लॉसी ब्लू, ग्लॉसी व्हाईट आणि ग्लॉसी लॅव्हेंडर कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोनवर 1 वर्षाची वॉरंटी उपलब्ध आहे. हा फोन लवकरच खरेदीसाठी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले गेले आहे.
Lava Yuva Smart चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
स्मार्टफोन ब्रँड Lava यांनी या मोबाइल फोनमध्ये 6.75 इंच लांबीचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 2.5D ग्लास आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 60Hz इतका आहे. याव्यतिरिक्त, फोनच्या सुरक्षिततेसाठी यात साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या लावा स्मार्टफोनमध्ये UNISOC 9863A ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, 3GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज आहे, जे आपण मायक्रो SD कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी, डिव्हाइसमध्ये 13MP प्राथमिक आणि AI लेन्स आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, फोनच्या समोर 5MP फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी उपलब्ध आहे. तसेच, यामध्ये LED फ्लॅश लाईट देखील देण्यात आली आहे. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 10W फास्ट चार्जिंगला समर्थन देणारी 5000mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट्स, वायफाय, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile