Price Drop! लोकप्रिय आणि स्वस्त Vivo फोनवर मिळतोय तब्बल 4000 रुपयांचा Discount, पहा ऑफर्स
कंपनीने अलीकडेच Vivo T3 Pro आणि Vivo T3 Ultra च्या किमतीत घसरण केली.
सीरीजच्या कमी बजेट स्मार्टफोन Vivo T3 Lite 5G च्या किमतीत देखील मोठी घसरण
हा फोन MediaTek Dimensity 6300 octa-core प्रोसेसरवर लाँच करण्यात आला.
सध्या शीर्षस्थानी असलेली प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच आपल्या ‘T’ सिरीजमधील दोन मिड-रेंज 5G फोन Vivo T3 Pro आणि Vivo T3 Ultra च्या किमतीत घसरण केली आहे. दरम्यान, आता त्याच सीरीजच्या कमी बजेट स्मार्टफोन Vivo T3 Lite 5G च्या किमतीत देखील मोठी घसरण केली आहे. या सवलतीसह Vivo T3 Lite 5G फोनचा 6GB रॅम मॉडेल 11,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. जाणून घेऊयात Vivo T3 Lite 5G वरील ऑफर्स-
SurveyAlso Read: Reveal! आगामी iQOO Neo 10R लवकरच भारतात Powerful प्रोसेसरसह होणार लाँच, पहा सर्व डिटेल्स

Vivo T3 Lite 5G ची किंमत आणि ऑफर्स
Vivo T3 Lite 5G फोन भारतीय बाजारात दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचे 4GB रॅम व्हेरिएंट 10,499 रुपये आणि 6GB रॅम व्हेरिएंट 11,499 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. हा फोन Flipkart वर 4000 रुपयांच्या सवलतीसह सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart वर हा फोन 1000 रुपयांच्या सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही सवलत Axis, SBI किंवा HDFC बँक क्रेडिट कार्डदारे पेमेंट व्यवहार केल्या मिळेल. हा Vivo 5G मोबाइल व्हायब्रंट ग्रीन आणि मॅजेस्टिक ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Vivo T3 Lite 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo T3 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 1612×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.56 इंच लांबीचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 6300 octa-core प्रोसेसरवर लाँच करण्यात आला. हा 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार केलेला मोबाइल चिपसेट आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 4GB रॅम आणि 6GB रॅमसह दोन रॅम व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहे. लक्षात घ्या की, या फोनमध्ये 6GB विस्तारित रॅम तंत्रज्ञान आहे.

फोटोग्राफीसाठी, Vivo T3 Lite 5G फोन ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर 50MP चा मुख्य सेन्सर प्रदान करण्यात आला आहे. जो 2MP डेप्थ सेन्सरसह कार्य करतो. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Vivo T3 Lite मध्ये 8MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5000mAh बॅटरीसह सज्ज आहे. ही मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी, स्मार्टफोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देखील आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी या फोनला ब्लूटूथ 5.4, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि FM रेडिओ देखील मिळतो.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile