Apple लव्हर्स! स्वस्त आणि मस्त लेटेस्ट iPhone मोठ्या Discount सह खरेदीची संधी, अशी डील पुन्हा मिळणे नाही

Updated on 24-Feb-2025
HIGHLIGHTS

प्रसिद्ध टेक जायंट Apple ने अलीकडेच स्वस्त iPhone लाँच केला आहे.

कंपनीने नवीन मोबाईल फोन iPhone 16e लाँच केला आहे.

Apple iPhone 16e वर सुरुवातीला उत्तम सवलत मिळणार आहे.

आपणा सर्वांना माहितीच आहे की, जग प्रसिद्ध टेक जायंट Apple ने अलीकडेच स्वस्त iPhone लाँच केला आहे. होय, कंपनीने नवीन मोबाईल फोन iPhone 16e लाँच केला आहे. Apple ने iPhone 16 सिरीजचा विस्तार केला आहे. कंपनीने हा एक परवडणारा iPhone सादर केला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 28 फेब्रुवारीपासून भारतात खरेदीसाठी उपलब्ध असेल. जर तुम्हालाही हा स्वस्त अ‍ॅपल मोबाईल कमी किमतीत घ्यायचा असेल तर, त्यावर सुरुवातीला 7 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. जाणून घेऊयात iPhone 16e ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: 32MP सेल्फी कॅमेरासह आकर्षक Vivo Y300 Plus 5G वर भारी Discount, मिळेल तब्बल 8000 रुपयांची सूट

iPhone 16e ची किंमत आणि ऑफर्स

iPhone 16e ची किंमत 59,990 रुपयांपासून सुरू होते. नवीन अ‍ॅपल फोनचा बेस व्हेरिएंट 128GB स्टोरेज व्हेरिएंटची ही किंमत आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सुरुवातीच्या सेलमध्ये कंपनी या मोबाईलवर 4000 रुपयांची सूट देत आहे. होय, सर्व ICICI बँकेच्या ग्राहकांना ही सवलत मिळेल. दुसरीकडे, जर नवीन iPhone 16e खरेदी करताना जुना मोबाईल बदल्यात 3000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध असेल. तसेच, कंपनी कोटक बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 4000 रुपयांची सूट देखील देईल. आयफोनवरील सध्याच्या प्लॅनअंतर्गत ते 52,990 रुपयांना खरेदी करता येईल.

iPhone 16e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लेटेस्ट iPhone 16e फीचर्स आणि स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.1 इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन OLED पॅनेलवर बनवली आहे. लक्षात घ्या की, हा शक्तिशाली Apple A18 चिपसेटवर लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, iPhone 16 मध्येही हाच प्रोसेसर आहे जो स्मूथ आणि फास्ट मल्टीटास्किंग करतो. Apple iPhone 16e हा Apple Intelligence द्वारे समर्थित आहे. या मोबाईलमध्ये ऑन-डिव्हाइस AI क्षमता देखील असेल. या फिचरद्वारे सामान्य फोन वापर, फोटो काढणे, फोटो एडिटिंग करणे आणि रिअल-टाइम सुधारणा करणे, हे सर्व होईल.

फोटोग्राफीसाठी, नवीन आयफोन 48MP कॅमेराला सपोर्ट करतो. हे लेन्स Apple इमेजिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हा 2x टेलिफोटो लेन्स आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, आयफोन 12MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये दीर्घकाळ टिकणारी बॅटरी उपलब्ध आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर फोनची बॅटरी 26 तासांपर्यंत टिकू शकते, असे कंपनीने सांगितले आहे. या फोनमध्ये वायरलेस Qi charging देखील उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :