Infinix Smart 9 HD Offers: 7000 रुपयांअंतर्गत लाँच झालेल्या स्वस्त स्मार्टफोनची सेल सुरु, गिफ्टिंगसाठी Best पर्याय

Infinix Smart 9 HD Offers: 7000 रुपयांअंतर्गत लाँच झालेल्या स्वस्त स्मार्टफोनची सेल सुरु, गिफ्टिंगसाठी Best पर्याय
HIGHLIGHTS

Infinix ने अलीकडेच Infinix Smart 9 HD नवा बजेट स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच केला.

Infinix Smart 9 HD ची विक्री आज म्हणजेच 4 फेब्रुवारी 2025 रोजी सुरु

Infinix Smart 9 HD ड्युअल फ्लॅश लाईटसह येणारा या सेगमेंटमधील पहिला फोन आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix ने Infinix Smart 9 HD नवा बजेट स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच केला आहे. दरम्यान, या Infinix Smart 9 HD ची पहिली सेल आजपासून सुरू होणार आहे. नुकतेच लाँच झालेल्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह दीर्घकाळ टिकणारी बॅटरी मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्या सेलमध्ये या बजेट फोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. यासह, हा परवडणारा स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदी करता येईल. नवीनतम Infinix Smart 9 HD स्मार्टफोनची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील जाणून घेऊयात-

Also Read: नवीनतम iQOO Neo 10R ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! मिळतील Powerful फीचर्स, पहा अपेक्षित किंमत

Infinix Smart 9 HD सेल ऑफर्स

Infinix Smart 9 HD ची विक्री आज म्हणजेच 4 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता Flipkart वर सुरू होईल. Infinix Smart 9 HD या स्मार्टफोनची किंमत 6,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या सेलमध्ये फोन खरेदी केल्यास तुम्हाला 500 रुपयांची सूट मिळेल. सवलतीसह तुम्ही हा फोन 6,199 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल.

या व्यतिरिक्त, हा फोन नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी करता येईल. कंपनीने हा फोन मिंट ग्रीन, कोरल गोल्ड आणि मेटॅलिक ब्लॅक या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Infinix Smart 9 HD फीचर्स आणि स्पेक्स

Infinix Smart 9 HD स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. चांगल्या परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये Octa Core Helio G50 प्रोसेसर दिला गेला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. मात्र, रॅम 3GB पर्यंत वाढवता येईल आणि मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल.

infinix smart 9 hd
Infinix Smart 9 HD

फोटोग्राफीसाठी, कंपनीने फोनच्या मागील बाजूस 13MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि ड्युअल एलईडी फ्लॅश दिला आहे. या सेगमेंटमधील हा पहिला स्मार्टफोन आहे, जो ड्युअल फ्लॅश लाईटसह येतो. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. चार्जिंगसाठी यात USB टाइप-C चार्जिंग पोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ब्लूटूथ, Wi-Fi आणि हेडफोन जॅक सारखी फीचर्स आहेत.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo