नवीनतम iQOO Neo 10R ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! मिळतील Powerful फीचर्स, पहा अपेक्षित किंमत
iQOO च्या आगामी Neo सीरीज स्मार्टफोन iQOO Neo 10R ची चर्चा सुरु
ब्रँडने iQOO Neo 10R पुढील महिन्यात मार्चमध्ये प्रवेश करणार असल्याची पुष्टी केली आहे.
आगामी फोन 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सेगमेंटमध्ये सर्वात वेगवान स्मार्टफोन असेल.
गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO च्या आगामी Neo सीरीज स्मार्टफोन iQOO Neo 10R ची चर्चा सुरु आहे. या फोनबद्दल सोशल मीडिया आणि ऑनलाईन अनेक लीक आले आहेत. दरम्यान, ब्रँडने पुढील महिन्यात मार्चमध्ये प्रवेश करणार असल्याची पुष्टी केली आहे. एवढेच नाही तर, फोनच्या महत्त्वाच्या तपशीलांसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर एक मायक्रोसाइट देखील लाईव्ह झाली आहे.
Also Read: Upcoming Smartphone: लोकप्रिय Honor च्या आगामी स्मार्टफोनसाठी सज्ज व्हा! Amazon वर दिसली पहिली झलक
यासोबतच, सोशल मीडियावर सतत अधिकतर माहिती देखील शेअर केली जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता iQOO Neo 10R ची भारतीय लाँचिंगची तारीख, लूक आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहिती पाहुयात-
iQOO Neo 10R ची भारतीय लॉन्चिंग
प्रसिद्ध iQOO ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर ट्विट करत आगामी स्मार्टफोनच्या भारतीय लॉन्चिंगबद्दल माहिती दिली आहे. होय, येत्या 11 मार्च रोजी भारतात Neo सिरीजमधील कंपनीचा पुढील स्मार्टफोन, iQOO Neo 10R लाँच करण्याची पुष्टी केली आहे. तसेच, Amazon मायक्रोसाईटनुसार, कंपनीने iQOO Neo 10R ला या सेगमेंटमधील सर्वात वेगवान स्मार्टफोन म्हणून वर्णन केले आहे. आगामी फोन 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सेगमेंटमध्ये सर्वात वेगवान स्मार्टफोन असेल, असेही म्हटले जात आहे.
Get ready for the ultimate revolution in performance and design with the #iQOONeo10R! ⚡
— iQOO India (@IqooInd) February 4, 2025
Launching on 11th March—mark your calendars! 🗓️
Available exclusively on on @amazonIN and https://t.co/bXttwlZo3N#AmazonSpecials #PowerToPlay #iQOONeo10R pic.twitter.com/7B0T2MVkUx
वरील पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, पिक्चरमध्ये फोन रॅगिंग ब्लू कलरमध्ये दिसत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हा रंग विशेषतः भारतासाठी खास ठेवण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता की, फोनची डिझाईन रेसिंग ट्रॅकपासून प्रेरित आहे, ब्लु आणि व्हाईट ड्युअल-टोन लूक मिळेल. स्मार्टफोनमध्ये स्क्वेअर राउंड कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्याचा बहुतेक मागील पॅनेल ब्लु आणि बाजू व्हाईट कलरमध्ये दिसत आहेत.
iQOO Neo 10R चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
पुढे आलेल्या लीकनुसार, iQOO Neo 10R या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा 1.5K AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, जी 144Hz रिफ्रेश रेटसह येते. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, iQOO Neo 10R फोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 SoC प्रोसेसर असेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB, 12GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळू शकते. फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा आणि मेन कॅमेरासाठी OIS सपोर्ट उपलब्ध असेल. ज्यामध्ये 50MP सोनी LYT-600 सेन्सर आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. लीकनुसार, या मोबाईलमध्ये 6400mAh बॅटरी असेल, असे समोर आले आहे. मात्र, iQOO Neo 10R फोनची खरी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile