Infinix Smart 9 HD
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix ने Infinix Smart 9 HD स्मार्टफोन आज म्हणजेच 28 जानेवारी 2025 रोजी लाँच करण्यात आला आहे. हा फोन कंपनीने अगदी प्रत्येकाच्या बजेटमध्ये लाँच केला आहे. या फोनमध्ये HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कमी किमतीत फोनमध्ये अनेक अप्रतिम फीचर्स उपलब्ध आहेत. हँडसेटमध्ये रॅम वाढवण्याचा पर्याय देखील आहे. याशिवाय, हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर चिपसेटने सुसज्ज आहे. जाणून घेऊयात Infinix Smart 9 HD ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
Also Read: 50MP कॅमेरासह येणार Vivo T3x 5G वर मिळतोय भारी Discount, किंमत 12000 रुपयांपेक्षा कमी
Infinix Smart 9 HD या स्मार्टफोनची किंमत 6,699 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या सेलमध्ये हा फोन 6,199 रुपयांना डिस्काउंटसह खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन एकाच प्रकारात येतो, जो 3GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो. फोनची विक्री 4 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरू होईल. या फोनमध्ये मिंट ग्रीन, कोरल गोल्ड आणि मेटॅलिक ब्लॅक कलर ऑप्शन्सचा समावेश आहे.
Infinix Smart 9 HD स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये ऑक्टा कोर हेलिओ G50 प्रोसेसर आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 3GB रॅम वाढवण्याचा पर्याय आहे. तसेच, या फोनमध्ये 64GB स्टोरेज आहे, जे मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी, हँडसेटच्या मागील बाजूस 13MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. या सेगमेंटमधील हा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये हा सेल्फी कॅमेरा आहे. कंपनीने फोनच्या मागील बाजूस ड्युअल LED फ्लॅशलाइट देखील देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोन चार्ज करण्यासाठी USB टाइप-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. या बॅटरीसह, फोन 14.5 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक, 8.6 तासांचा गेमिंग टाइम देतो.