Infinix Note 50s 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix ने भारतात आपला नवीन Infinix Note 50s 5G फोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा झाल्यापासून हा फोन चर्चेत आहे. कारण, हे पहिले उपकरण आहे ज्याच्या मागील पॅनलमधून सुगंध येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, यासाठी एनर्जायझिंग सेन्ट-टेक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग फीचर्स उपलब्ध आहेत. जाणून Infinix Note 50s 5G फोनची किंमत आणि सर्व फीचर्स-
Also Read: 50MP कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसह येणाऱ्या Samsung फोनवर भारी सवलती, पहा ऑफर्स
Infinix Note 50s 5G फोनच्या 8GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. तर, त्याचा 8GB+ 256GB स्टोरेज मॉडेल 17,999 रुपयांना उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 24 एप्रिलपासून Flipkart वर सुरू होईल. त्यासह या फोन मरीन ड्रिफ्ट ब्लू, टायटॅनियम ग्रे आणि रुबी रेड कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.
Infinix Note 50s 5G च्या मागील पॅनलमध्ये एक खास Scent Tech फीचर कंपनीने दिला आहे. या विशेषतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा एक तीव्र सुगंध देतो, जो बराच काळ टिकतो. त्याला MIL-STD 810H मिलिटरी ग्रेड देखील मिळाला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, जर तो पडला तर फोनच्या बॉडीला सहज नुकसान होणार नाही.
Infinix Note 50s 5G हा कंपनीचा सर्वात स्लिम आणि वेगळा स्मार्टफोन असेल. या डिव्हाइसमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी हँडसेटवर गोरिल्ला ग्लास 5 बसवण्यात आला आहे, त्याची स्क्रीन TUV प्रमाणित आहे. सुरक्षेसाठी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा देखील उपलब्ध आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 अल्टिमेट प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये LED फ्लॅश लाईटसह 64MP कॅमेरा सेटअप आहे. याद्वारे 4K व्हिडिओ शूट करता येतात, यात 10X झूम आहे. याशिवाय, आकर्षक सेल्फीसाठी हँडसेटच्या पुढील बाजूस 13MP कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, या कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी दिली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी, डिव्हाइसमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.