Smartphones Under Rs.15000: नुकतेच लाँच झालेल्या नवीनतम 5G स्मार्टफोनची यादी, Realme, IQOO चे फोन्स उपलब्ध

HIGHLIGHTS

सुप्रसिद्ध ब्रँड्सच्या 15000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या नवीनतम टॉप 5G मोबाइल फोनची यादी

Redmi 12 5G फोनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरू

Moto G34 5G स्मार्टफोन या उपकरणाची किंमत देखील 10,999 रुपयांपासून सुरू

Smartphones Under Rs.15000: नुकतेच लाँच झालेल्या नवीनतम 5G स्मार्टफोनची यादी, Realme, IQOO चे फोन्स उपलब्ध

भारतीय बाजरात अलीकडेच अनेक नवे स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. सध्या स्मार्टफोन निर्माता कंपन्या बजेट रेंजमध्ये पॉवरफुल फीचर्ससह Smartphones ऑफर करत आहेत. ग्राहकांना या बजेट विभागामध्ये आता अनेक स्मार्टफोन मिळतील. यामध्ये एकूण कार्यप्रदर्शन, बॅटरी लाइफ, डिस्प्ले क्वॉलिटी, कॅमेरा इ. सर्व फीचर्स मिळतील. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी अलीकडेच लाँच झालेल्या सुप्रसिद्ध ब्रँड्सच्या 15000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या टॉप 5G मोबाइल फोनची यादी तयार केली आहे. बघा यादी-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा: 50MP प्रायमरी कॅमेरासह OPPO Reno 11 Pro 5G फोनच्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News

Realme 11X 5G

Realme 11X 5G ची किंमत 14,999 रुपयांपासून सुरू होते. नव्या 5G स्मार्टफोन Realme 11X फोनमध्ये 6.72-इंच लांबीचा डायनॅमिक अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले देखील आहे. कार्यप्रदर्शनासाठी MediaTek डायमेंशन 6100+ 5G चिपसेट आहे. फोनला पॉवर करण्यासाठी 5000 mAh बॅटरी देखील आहे. त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे.

realme 11x 5g smartphones under rs 15000

Redmi 12 5G

Redmi 12 5G फोनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरू होते. हा स्मार्टफोन 6.79-इंच लांबीच्या FHD+ LCD डिस्प्लेसह येतो. फोटोग्राफीसाठी, यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये LED फ्लॅशसह 50MP प्राथमिक कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2MP डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, हा हँडसेट 5000mAh बॅटरीसह येतो, जो 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

iQOO Z7s 5G

iQOO Z7s 5G फोनची सुरुवातीची किंमत देखील 14,999 रुपये आहे. iQOO Z7s स्मार्टफोनमध्ये 6.38-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले मिळेल. परफॉर्मन्ससाठी यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटद्वारे समर्थित आहे. हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो, ज्यामध्ये 64MP मुख्य सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल.

iQOO Z7s 5G
iQOO Z7s 5G

Moto G34 5G

Moto G34 5G स्मार्टफोन या उपकरणाची किंमत देखील 10,999 रुपयांपासून सुरू होते. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Qualcomm Snapdragon 695 6nm 5G प्रोसेसर द्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी, हँडसेट f/1.8 अपर्चरसह 50MP रिअर कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरासह सुसज्ज आहे. याशिवाय, यात 5000mAh बॅटरी आहे जी 20W टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo