50MP प्रायमरी कॅमेरासह OPPO Reno 11 Pro 5G फोनच्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News 

50MP प्रायमरी कॅमेरासह OPPO Reno 11 Pro 5G फोनच्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

OPPO Reno 11 Pro 5G च्या किमतीत कपातीची घोषणा करण्यात आली आहे.

कंपनी यासह 10% कॅशबॅक आणि 6 महिने नो-कॉस्ट EMI पर्याय देखील ऑफर करेल.

फोन नव्या किमतीसह Oppo च्या अधिकृत साईटवर लाँच करण्यात आला आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OPPO ने जानेवारीमध्ये भारतीय बाजारपेठेत आपली Reno 11 सिरीज सादर केली होती. या सिरीजअंतर्गत OPPO Reno 11 आणि OPPO Reno 11 Pro 5G हे फोन लाँच करण्यात आले आहेत. दरम्यान, आता ब्रँडने आपले फ्लॅगशिप लेव्हल Pro मॉडेलच्या किमतीत कपातीची घोषणा केली आहे. तुम्हाला हा फोन सध्या 2,000 रुपयांच्या सवलतीसह मिळेल. जर तुम्हीही नवीन आणि मजबूत स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Reno 11 Pro हा एक उत्तम पर्याय आहे. बघा फोनची नवी किंमत-

हे सुद्धा वाचा: Google Pixel 8a भारतात AI फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत, उपलब्धता आणि Special ऑफर्स। Tech News

OPPO Reno 11 Pro 5G च्या किमतीत कपात

OPPO Reno 11 Pro 5G फोन 39,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. 2,000 रुपयांच्या किंमतीत कपातीनंतर Oppo Reno 11 Pro 5G स्मार्टफोन सध्या 37,999 रुपयांच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोन नव्या किमतीसह Oppo च्या अधिकृत साईटवर लाँच करण्यात आला आहे.

Oppo Reno 11 Pro 5G

एवढेच नाही तर, कंपनी यासह 10% कॅशबॅक आणि 6 महिने नो-कॉस्ट EMI पर्याय देखील ऑफर करेल. तर, Flipkart वर SBI क्रेडिट कार्डच्या मदतीने 10% झटपट सूट मिळेल. त्याबरोबरच, प्रचंड एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. वापरकर्त्यांना फोन पर्ल व्हाइट आणि रॉक ग्रे या दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.

OPPO Reno 11 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 11 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेट टेक्नॉलॉजीसह 6.7-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. हा फ्लॅगशिप Oppo मोबाईल MediaTek Dimensity 8200 चिपसेट सह येतो. तसेच, यात ग्राफिक्ससाठी Mali-G610 MC6 GPU देखील आहे. सुरक्षेसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 12GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 256GB UFS 3.1 इंटर्नल स्टोरेजसह येतो.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये OIS आणि LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50MP प्रायमरी, 32MP टेलिफोटो आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP Sony IMX709 फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 80W फास्ट चार्जिंगसह 4700mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo