JioPhone 5G चे स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच आले समोर, मिळतील उत्तम फीचर्स

Updated on 29-Sep-2022
HIGHLIGHTS

JioPhone 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक

फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असू शकते

तर, हा फोन 8 ते 12 हजार रुपयांच्या किंमतीसह येण्याची शक्यता आहे.

वापरकर्ते JioPhone 5G ची आतुरतेने वाट पाहत आहेत. कंपनीने अद्याप फोनची लाँच डेट कन्फर्म केलेली नाही, परंतु त्याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक होऊ लागले आहेत. लीकनुसार, Jio Phone 5G चे कोडनेम 'गंगा' आणि मॉडेल नंबर LS1654QB5 आहे. जिओचा हा आगामी फोन 4 GB रॅमसह येईल आणि त्यात स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट असेल, असे सांगितले जात आहे. कंपनी हा फोन LYF च्या भागीदारीत लाँच करू शकते आणि Jio Phone True 5G moniker सोबत त्याची विक्री केली जाईल.

हे सुद्धा वाचा : ट्रेनचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही? WhatsApp वर PNR स्टेटस तपासा, मिळतील लाइव्ह अपडेट्स

आगामी फोनचे संभावित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार, कंपनी JioPhone 5G मध्ये 6.5-इंच लांबीचा HD + LCD पॅनल ऑफर करणार आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. सॅमसंगचा 4 GB LPDDR4X रॅम आणि 32 GB इंटरनल स्टोरेज फोनमध्ये दिले जाऊ शकते. प्रोसेसर म्हणून कंपनी यामध्ये स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट देऊ शकते. फोटोग्राफीसाठी तुम्ही फोनमध्ये LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप पाहू शकता.

यात 13-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सोबत 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळेल, अशी माहिती मिळाली आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. OS बद्दल बोलायचे झाले तर फोन Android 12 वर बॉक्सच्या बाहेर काम करेल. यासोबतच कंपनी Jio ऍपसह प्री-लोडेड गुगल मोबाइल सेवाही देणार आहे. 

याव्यतिरिक्त, फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 8 ते 12 हजार रुपयांच्या किंमतीसह येण्याची शक्यता आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :