Jio Phone 5G : Jio चा 5G फोन लवकरच लाँच होणार, किंमत असेल इतकी कमी

Updated on 14-Aug-2022
HIGHLIGHTS

Jio चा 5G फोन लवकरच होणार लाँच

Jio Phone 5G ची किंमत फक्त 2,500 रुपये असण्याची शक्यता

जाणून घ्या, Jio Phone 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

देशातील सर्व टेलिकॉम कंपन्या 5G लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. Jio, Airtel आणि Vodafone Idea या तिन्ही कंपन्यांनी 5G टेस्ट पूर्ण केली आहे आणि व्यावसायिक लाँचची वेळ जवळ आली आहे. गेल्या वर्षी Google च्या भागीदारीत, Jio ने 4G स्मार्टफोन Jio Phone Next सादर केला होता. त्यानंतर, आता असे वृत्त आहे की, Jio 5G फोनची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार, Jio Phone 5G लवकरच लाँच केला जाऊ शकतो. 

हे सुद्धा वाचा : VLC Media Player Ban: BGMI नंतर सरकारने आणखी एका चायनीज ऍपवर बंदी घातली, काय आहे कारण…

Jio Phone 5G लॉन्चिंग कधी होणार ?

Jio Phone 5G फोन या वर्षाच्या अखेरीस लाँच केला जाईल, असे सांगितले जात आहे. Jio Phone 5G ची किंमत 12,000 रुपयांच्या जवळपास असू शकते. हा देशातील सर्वोत्तम 5G फोन असू शकतो. एका दुसऱ्या अहवालानुसार Jio Phone 5G ची किंमत फक्त 2,500 रुपये असेल. अशा परिस्थितीत Jio Phone 5G हा फीचर फोन असेल अशीही अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, अहवालात असा दावाही केला जात आहे की, 2,500 रुपयांचे डाउन पेमेंट असेल आणि उर्वरित रक्कम EMI द्वारे भरावी लागेल. 

Jio Phone 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Jio Phone 5G मध्ये 6.5-इंच लांबीचा HD + IPS LCD डिस्प्ले मिळू शकतो, ज्याचे रिझोल्यूशन 1600×720 पिक्सेल असेल. फोनला स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसर आणि 4 GB रॅमसह 32 GB स्टोरेज मिळेल. हा सर्वात स्वस्त 5G प्रोसेसर आहे.

याशिवाय, Jio Phone 5G सह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो असेल. समोर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :