प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Itel बेस्ट बजेट स्मार्टफोन देण्यासाठी ओळखली जाते. Itel A95 5G फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीचा नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे, जो 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर करण्यात आला आहे. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 6.67 इंच लांबीचा एचडी+ डिस्प्लेसह येतो. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. चला तर मग जाणून घेऊयात Itel A95 5G ची भारतीय किंमत आणि सर्व तपशील-
Also Read: लेटेस्ट Vivo V50e फोनची भारतात सेल सुरु! जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि टॉप फीचर्स
Itel कंपनीने भारतात Itel A95 5G फोन 9,599 रुपयांच्या किमतीत सादर केला आहे. ही किंमत फोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. याव्यतिरिक्त, या फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या या व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये इतकी आहे. हा फोन ब्लॅक, गोल्डन आणि मिंट कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Itel च्या या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला या फोनमध्ये 6GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. तसेच, हा फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. सुरक्षेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Itel A95 5G फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, यासह तुम्हाला 10W चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो. पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP54 रेटिंग मिळाले आहे. हा बजेट फोन वापरकर्त्यांना 5G कनेक्टिव्हिटीची सुविधा देणार आहे.