प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने अलीकडेच iQOO Z10 सिरीज भारतीय बाजारात लाँच केली. या सिरीजअंतर्गत दोन स्मार्टफोन iQOO Z10 आणि iQOO Z10x 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आले. त्यानंतर, आज iQOO Z10x 5G स्मार्टफोनची पहिली सेल आज म्हणजेच 22 एप्रिल 2025 रोजी सुरु होणार आहे. पहिल्या सेलमध्ये, सवलतीसह स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी असेल. चला तर मग जाणून घेऊयात iQOO Z10x 5G ची किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
Also Read: बहुप्रतीक्षित Vivo X200 Ultra फोन अखेर लाँच, 200MP कॅमेरासह अनेक विशेष फीचर्स उपलब्ध
iQOO Z10x 5G स्मार्टफोनची पहिली सेल आज म्हणजेच 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सुरु होणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन पहिल्या सेलमध्ये 1000 रुपयांच्या त्वरित सवलतीसह खरेदी करता येईल. ही ऑफर SBI आणि ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास उपलब्ध असेल.
या फोनचा बेस व्हेरिएंट 13,499 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. ही त्याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला दुसरा व्हेरिएंट 14,999 रुपयांना येतो. 8GB रॅम+ 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 16,499 रुपयांना आणण्यात आला आहे.
iQOO Z10x 5G च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच लांबीचा LCD डिस्प्ले देण्यात एक आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेचे पिक्सेल रिझोल्यूशन 1408x 1080 इतके आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये या सेगमेंटमधील सर्वात वेगवान प्रोसेसर, मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर आहे. हा हँडसेट अँड्रॉइड 15 वर आधारित फनटच OS 15 वर कार्य करतो.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB पर्यंत मिळेल. फोनमधील बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 44W फ्लॅशचार्ज आणि रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच, चार्जिंगसाठी यात USB टाइप-C पोर्ट देखील उपलब्ध आहे.