iQOO Z10 5G SERIES
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने iQOO Z10 5G सिरीज आज भारतीय बाजारात लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत, कंपनीने iQOO Z10 5G आणि iQOO Z10x 5G असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. या सिरीजमधील टॉप मॉडेल मोठ्या बॅटरी पॅकसह सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या बॅटरी पॅकसह येणारा हा भारतातील आतापर्यंतचा पहिला स्मार्टफोन आहे. एवढेच नाही तर, या बॅटरी पॅकसह येणारा हा भारतातील सर्वात स्लिम स्मार्टफोन देखील आहे.
Also Read: त्वरा करा! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येणाऱ्या Vivo फोनवर तब्बल 8000 रुपयांच्या Discount
चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात, iQOO Z10 5G सिरीजची किंमत आणि सर्व टॉप फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
iQOO Z10 5G स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा 8GB रॅम+ 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 21,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. त्याबरोबरच, 256GB स्टोरेज आणि 8GB रॅम असलेल्या व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. 12GB रॅम+ 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 25,999 रुपयांना आणण्यात आला आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या पहिल्या सेलमध्ये या फोनवर 2000 रुपयांची बँक सूट उपलब्ध असेल. त्याबरोबरच, या फोनवर 2000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध असेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 16 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. यामध्ये स्टेलर ब्लॅक आणि ग्लेशियर सिल्व्हर कलर ऑप्शन्स मिळतील.
iQOO Z10x 5G फोनचा 6GB+ 128GB बेस व्हेरिएंट 13,499 रुपयांना सादर करण्यात आला आहे. तर, फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला दुसरा व्हेरिएंट 14,999 रुपयांना येतो. याव्यतिरिक्त, या फोनचा 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 16,499 रुपयांना आणण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1000 रुपयांची फ्लॅट सूट देखील उपलब्ध असेल. फोनची विक्री Amazon वरून 22 एप्रिल 2025 पासून सुरू होईल.
iQOO Z10 5G फोन 2392x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.77-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. ही पंच-होल स्टाईलची स्क्रीन आहे, जी AMOLED पॅनेलवर बनवली आहे. iQOO Z10x मध्ये 6.72-इंच लांबीचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.
iQOO ने iQOO Z10 5G फोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर दिला आहे. त्याबरोबरच, दुसरीकडे iQOO Z10x 5G फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे. हे विविध अनुप्रयोगांसाठी उत्कृष्ट कामगिरी आणि कार्यक्षमता देण्यासाठी डिझाइन केलेले उच्च-कार्यक्षमतेसह येणारे प्रोसेसर आहे.
iQOO Z10 5G स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी OIS सपोर्टसह 50MP IMX882 मुख्य कॅमेरा आहे. मागच्या बाजूला दुसरा 2MP सेन्सर देखील उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे.
फोटोग्राफीसाठी, iQOO Z10x 5G फोनमध्ये रियर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. तर, त्याचा दुय्यम कॅमेरा 2MP चा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे.
iQOO Z10 5G फोनमध्ये 7300mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. यासह, 90W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देखील देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे iQOO Z10x 5G फोनमध्ये 6500mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. यासह, 44W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देण्यात आला आहे.
iQOO Z10 5G सिरीज फोनमध्ये अनेक AI फीचर्स देखील उपलब्ध आहेत. ज्यात AI Erase, AI Super Document, AI Note Assist यांचा समावेश आहे.