जगप्रसिद्ध टेक जायंट Apple या वर्षाच्या अखेरीस iPhone 17 सिरीज लाँच करण्यासाठी सज्ज होत आहे. आपण सर्वांना माहितीच आहे की, अलीकडेच Apple ने iPhone 16e स्मार्टफोन टेक विश्वात दाखल केला आहे. लक्षात घाई एके, या मॉडेलने iPhone SE मॉडेलची जागा घेतली आहे. त्यांनतर, कंपनी आता iPhone 17 सिरीजमध्येही असेच काहीतरी करण्याची योजना आखत आहे.
Also Read: Google Pixel 9a लवकरच होणार दाखल! किंमत लीक, लाँचपूर्वीच प्लॅन करा नव्या फोनसाठी बजेट
आम्ही तुम्हाला सांगतो की, ताज्या अहवालानुसार Apple या सिरीजमध्ये प्लस आणि प्रो मॅक्स मॉडेल सादर करणार नाही, असे पुढे आले आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात आगामी iPhone 17 सिरीजच्या स्मार्टफोन मॉडेल्सबद्दल पुढे आलेली माहिती-
आगामी iPhone 17 सिरीजबद्दल गेल्या अधिक काळापासून लीक्स पुढे येत आहेत. यापूर्वी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सुचवण्यात आले होते की, कंपनी आगामी सिरीज iPhone Plus आणि Pro Max काढून टाकेल. या सिरीजच्या जागी, iPhone 17 Air आणि iPhone 17 Ultra मॉडेल्स लाँच केले जातील. आगामी सिरीजमध्ये हे नवीन मॉडेल्स लाँच होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे.
आगामी स्मार्टफोन्सच्या विशेषतांबद्दल बोलायचे झाल्यास, लीकनुसार, iPhone 17 Ultra मॉडेलमध्ये उच्च दर्जाच्या विशेष फीचर्ससह येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ते उर्वरित लाइनअपपेक्षा वेगळे असेल. iPhone 17 Air हा Plus व्हेरिएंटची जागा घेईल आणि तो स्लिमर फॉर्म फॅक्टरसह येईल, असे देखील सांगण्यात आले आहे. अनेक अहवालांनुसार, iPhone 17 Air फोन iPhone पेक्षा 30% स्लिम असू शकतो. यामुळे तो Apple च्या सर्वोत्तम स्मार्टफोनपैकी एक बनेल ,असे सांगतिले जात आहे.
लक्षात घ्या की, रिपोर्ट्सनुसार Apple च्या iPhone Plus मॉडेलच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. म्हणूनच हे मॉडेल कंपनीने पूर्णपणे काढून टाकण्याची योजना आखली आहे. अहवालांनुसार, या फोनच्या अल्ट्रा मॉडेलमध्ये एक मोठा बॅटरी पॅक आणि एक लहान आकाराचा डायनॅमिक आयलंड मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, यात उत्तम AI प्रोसेसिंग, स्मूथ परफॉर्मन्स आणि स्टोरेज मिळेल. ही देखील एक लक्षणीय सुधारणा मिळू शकते.