प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix ने प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix च्या Infinix Note 50s 5G+ फोनची भारतीय लाँच डेट निश्चित करण्यात आली आहे. हा कंपनीचा नवीनतम तंत्रज्ञानाचा फोन असणार आहे, जो ‘एनर्जायझिंग सेन्ट-टेक’ सोबत येईल. सोप्या भाषेत, हा फोन हा मार्केटमधील हा पहिला-वहिला सुगंधित फोन असणार आहे. या फोनमध्ये एका खास प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, ज्याद्वारे फोनमधून सुगंध येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात आगामी सुगंधित Infinix Note 50s 5G+ फोनचे भारतीय लाँच टाइमलाईन आणि सर्व तपशील-
Also Read: AC Deals Under 30000: आता परवडणाऱ्या किमतीत 1 टनचे स्प्लिट एसी खरेदी करा! पहा बेस्ट डील्स
Infinix कंपनीने Infinix Note 50s 5G+ फोनच्या भारतीय लाँचिंग तारखेची पुष्टी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Infinix Note 50s 5G+ फोन येत्या 18 एप्रिल रोजी भारतात लाँच होईल. आम्ही सांगितल्याप्रमाणे, कंपनी हा फोन ‘एनर्जायझिंग सेन्ट-टेक’ सह सादर केला जाईल.
वर सांगितल्याप्रमाणे, Infinix Note 50s 5G+ फोनमध्ये Microencapsulation तंत्रज्ञान वापरले जाईल. हे तंत्रज्ञान फोनच्या व्हेगन लेदर बॅक पॅनलला सुगंध देणार आहे. हे तंत्रज्ञान विशेषतः सुगंध सोडण्यासाठी डिझाइन केलेले आहे. मात्र, विशेषतः हे सुगंध फीचर्स केवळ फोनच्या मरीन ड्रिफ्ट ब्लू प्रकारात उपलब्ध असेल.
या व्हेरिएंटमध्ये बहु-स्तरीय सुगंध असेल, ज्याचा वरचा भागावर मरीन आणि लिंबाचा सुगंध असेल. तर, पॅनेलच्या मध्यभागी लिली ऑफ द व्हॅलीचा सुगंध जाणवेल आणि अखेर बेस नोटमध्ये Amber and Vetiver चा सुगंध असेल. तर, हा फोन टायटॅनियम ग्रे आणि रुबी रेड या दोन कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या कंपनीने फोनच्या केवळ याच खास फीचरशी संबंधित माहिती उघड केली आहे. अर्थातच फोनबद्दल संपूर्ण माहिती Infinix Note 50s 5G+ लाँच होताच उघड होईल.
Infinix ने अलिकडेच Infinix Note 50x 5G+ फोन भारतात लाँच केला आहे. हा फोन कंपनीने 11,499 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन कंपनीचा बजेट श्रेणीचा स्मार्टफोन आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे.