6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह Infinix Hot 12 ची पहिली सेल आज, 750 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा

6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह Infinix Hot 12 ची पहिली सेल आज, 750 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा
HIGHLIGHTS

Infinix Hot 12 ची पहिली विक्री आज

नवीन स्मार्टफोन फ्लिपकार्टद्वारे विक्रीसाठी उपलब्ध

नवीन स्मार्टफोन 750 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

 Infinix Hot 12 ची विक्री आज 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू होईल. Infinix चा नवीन स्मार्टफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. कारण इतक्या कमी किमतीत दमदार फीचर्स असलेला फोन मिळणे ही खरोखरच उत्तम ऑफर आहे. फोनमध्ये MediaTek Helio G37 चिप, 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. जाणून घेऊयात फोनची किंमत, सेल ऑफर्स आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती…

हे सुद्धा वाचा : OnePlus Nord 3: 'हा' लोकप्रिय फोन लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Infinix Hot 12 

हा Infinix फोन 6.82-इंच लांबीचा HD+ (720×1,612 pixels) IPS LCD डिस्प्ले दाखवतो. फोन ऑक्टा-कोर MediaTek Helio G37 चिपने सुसज्ज आहे. फोनमध्ये रॅम एक्सपेंशन फिचर देखील आहे, जे फोनची रॅम 7GB पर्यंत वाढवते. Hot 12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये f/1.6 अपर्चर लेन्ससह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे. यात 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि AI कॅमेरा देखील आहे.
infinix hot 12
सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी, स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चर लेन्ससह 8-मेगापिक्सेल सेन्सर आहे. मागील कॅमेरासह क्वाड LED फ्लॅश आणि फ्रंट शूटरसह ड्युअल LED फ्लॅश आहे. यामध्ये 64GB इनबिल्ट स्टोरेज आहे, जे मायक्रोSD कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येते. यात बॅक-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Infinix Hot 12 ची किंमत आणि सेल ऑफर्स 

Infinix Hot 12 ची भारतात किंमत 9,499 रुपये ठेवण्यात आली आहे.तुम्ही हा फोन चांगल्या कंडिशनच्या स्मार्टफोनसोबत एक्सचेंज करून खरेदी केल्यास तुम्हाला ₹8,750 ची सूट मिळेल. त्यानंतर हा फोन 750 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुमचा असेल. यासोबतच हा फोन ₹ 330/महिना च्या EMI वर देखील खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन एक्सप्लोरेटरी ब्लू, पोलर ब्लॅक, पर्पल आणि टर्क्वाइज सायन कलरमध्ये खरेदी करता येईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo