सर्वात मजबूत डिस्प्लेसह येणारा Honor X9b 5G फोन आतापर्यंतच्या मोठ्या Discount सह उपलब्ध, बघा Best डील

Updated on 19-Apr-2024
HIGHLIGHTS

Honor X9b 5G स्मार्टफोन प्रचंड डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनवर तब्बल 7,000 रुपयांपर्यंत ऑफर उपलब्ध आहेत.

Honor X9b 5G हा अल्ट्रा बाऊन्स अँटी ड्रॉप तंत्रज्ञान असलेला भारतातील पहिला फोन

Honor ने गेल्या फेब्रुवारी महिन्यात आपला नवीन स्मार्टफोन Honor X9b 5G लाँच केला होता. कंपनीने हा स्मार्टफोन 26,000 रुपयांना सादर केला होता. परंतु, आता त्यावर 7,000 रुपयांपर्यंत ऑफर उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन सर्वात स्वस्त दरात विक्रीसाठी उपलब्ध आहे. इतकंच नाही तर, कंपनी डिवाइससोबत 699 रुपये किमतीचा Violet Htech 30W चार्जर देखील मोफत देत आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनची नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: Price Cut! कंपनीने Redmi Pad च्या किमतीत केली घट, जाणून घ्या 10 इंच स्क्रीन टॅबलेटची नवी किंमत। Tech News

Honor X9b 5G वरील ऑफर्स

Honor X9b 5G Offers

सध्या Honor X9b 5G फोनवर 1,000 रुपयांचा प्राईस ड्रॉप, 2,000 रुपयांची बँक सवलत आणि 4,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. यासोबतच, वर सांगितल्याप्रमाणे, 699 रुपये किमतीचा Violet Hitech 30W चार्जर देखील मोफत उपलब्ध आहे. अशाप्रकारे सर्व ऑफर्स मिळून 25,999 रुपयांचा Honor X9b 5G स्मार्टफोन 7,000 रुपयांच्या कपातीनंतर केवळ 18,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

एवढेच नाही तर, या सर्व ऑफर्सशिवाय नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील आहे. ज्यामध्ये यूजर्स 3 ते 6 महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI मिळवू शकतात. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्य्यास, तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ला भेट देऊ शकता.

Honor X9b 5G चे Ultra-Bounce Anti-Drop तंत्रज्ञान

Honor X9b 5G हा अल्ट्रा बाऊन्स अँटी ड्रॉप तंत्रज्ञान असलेला भारतातील पहिला फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. या टेक्नॉलॉजीची विशेषता म्हणजे तुमचा फोन पडला तर त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही. ब्रँडने यावर बरीच टेस्टिंग केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक युजर्सनी यासाठी मोबाईलला चांगले रेटिंगही दिले आहे.

Honor X9b 5G

Honor X9b 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

Honor X9b 5G फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. तसेच यात पंच-होल डिझाइन आहे. परफॉर्मन्ससाठी मोबाइलमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी, Honor X9b 5G फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 108MP प्रायमरी, 5MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP लेन्स मिळेल. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5,800 mAh बॅटरी आणि 35W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :