भारीच की! HMD ची पहिली स्मार्टफोन सीरीज लाँच, 50MP फ्रंट कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स। Tech News

Updated on 25-Apr-2024
HIGHLIGHTS

HMD कंपनीने HMD ब्रँडिंग अंतर्गत आपली पहिली स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे.

या सिरीजअंतर्गत कंपनीने HMD Pulse, HMD Pulse+ आणि HMD Pulse Pro असे तीन स्मार्टफोन लाँच

फोन्ससोबत 2 वर्षांच्या Android OS अपडेट्सचे आश्वासन देखील दिले आहे.

प्रसिद्ध नोकिया मोबाईल उत्पादक कंपनी HMD कंपनीने HMD ब्रँडिंग अंतर्गत आपली पहिली स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. हे स्मार्टफोन सध्या ग्लोबली लाँच करण्यात आले आहेत. या सिरीजअंतर्गत कंपनीने HMD Pulse, HMD Pulse+ आणि HMD Pulse Pro असे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे सर्व फोन अँड्रॉइड 14 वर काम करतात. कंपनीने या फोन्ससोबत 2 वर्षांच्या Android OS अपडेट्सचे आश्वासन देखील दिले आहे. फोटोग्राफीच्या बाबतीत हे फोन एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात स्मार्टफोन्सची किंमत आणि संबंधित फीचर्स-

हे सुद्धा वाचा: आता WhatsApp वरच तयार करा इच्छित AI इमेजेस, ‘हे’ फिचर करणार थर्ड पार्टी Appsची सुट्टी? Tech News

HMD Pulse Pro, Pulse and Pulse+ ची किंमत

HMD Pulse Pro, Pulse and Pulse+ ची किंमत. HMD पल्स फोनची सुरुवातीची किंमत EUR 140 म्हणजेच अंदाजे 12,460 रुपये आहे. या फोनमध्ये Atmos Blue, Dreamy Pink आणि Meteor Black कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे, HMD Pulse+ EUR 160 म्हणजेच अंदाजे 14,240 रुपयांमध्ये सादर केले आहे. या फोनमध्ये ऍप्रिकॉट क्रश, ग्लेशियर ग्रीन आणि मिडनाईट ब्लू कलर ऑप्शन आहेत.

याव्यतिरिक्त, HMD Pulse Pro फोनची किंमत EUR 180 म्हणजेच अंदाजे 16,000 रुपयांपासून सुरू होते. या फोनमध्ये ब्लॅक ओशन, ग्लेशियर ग्रीन आणि ट्वायलाइट पर्पल कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

HMD Pulse Series चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

HMD Pulse Series मधील तिन्ही फोन HMD Pulse, HMD Pulse+ आणि HMD Pulse Pro मध्ये 6.65 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे.

प्रोसेसर आणि स्टोरेज

सिरीजमधील तिन्ही स्मार्टफोन ऑक्टा-कोर 12nm Unisoc T606 प्रोसेसरने सुसज्ज आहेत. यामध्ये 6GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मॉडेलचा समावेश आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, HMD पल्स फोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आहे. तर प्रो मॉडेलमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. दोन्ही फोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

तर दुसरीकडे, HMD Pulse Pro मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच 2MP डेप्थ सेन्सर देखील आहे. हा फोन सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरासह येतो.

बॅटरी

हे तिन्ही फोन 5000mAh बॅटरीसह येतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सिरीजमधील फक्त प्रो मॉडेल 20W जलद चार्जिंगला सपोर्ट करतो. तर, उर्वरित दोन्ही फोन 10W फास्ट चार्जिंगसह येतात. हे फोन एका चार्जवर 59 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतात, असा दावा कंपनीने केला आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :