HMD 105 आणि HMD 110 नवे फीचर फोन भारतात लाँच, किंमत 999 रुपयांपासून सुरु

HMD 105 आणि HMD 110 नवे फीचर फोन भारतात लाँच, किंमत 999 रुपयांपासून सुरु
HIGHLIGHTS

Nokia मोबाईल कंपनीने भारतात HMD 105 आणि HMD 110 हे दोन फिचर फोन सादर केले.

HMD Global ने भारतात लॉन्च केलेल्या HMD 105 ची किंमत 999 रुपये आहे.

नवे फोन्स फोटो टॉकर आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंग सारख्या फीचर्सना देखील समर्थन देतात.

पहिले HMD फीचर फोन आज भारतात लॉन्च झाले आहेत. Nokia मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने भारतात HMD 105 आणि HMD 110 हे दोन बटन फोन सादर केले आहेत. ‘भरोसा वही, शुरुआत नई’ या टॅगलाइनसह कंपनीने हे दोन्ही फोन्स आणले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही फोन 1 वर्षाच्या रिप्लेसमेंट गॅरंटीसह येतात. ज्या अंतर्गत डिव्हाइस खराब झाल्यास, ग्राहकांना नवीन मोबाइल दिला जाईल. जाणून घेऊयात संपूर्ण तपशील-

Also Read: Nothing आणतोय आतापर्यंतचा सर्वात स्वस्त फोन! लाँचपूर्वीच किंमत लीक, CMF Phone 1 तुमच्या बजेटमध्ये आहे का?

HMD 105 आणि HMD 110 फिचर फोनची किंमत

HMD Global ने भारतात लॉन्च केलेल्या HMD 105 ची किंमत 999 रुपये आहे. तर, HMD 110 ची किंमत 1,199 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. HMD 105 ब्लॅक, पर्पल आणि ब्लु कलरमध्ये खरेदी करता येईल. तर HMD 110 ब्लॅक आणि ग्रीन कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे. हे दोन्ही कीपॅड फोन ऑनलाइन शॉपिंग साइट्स आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकतात.

nokia hmd 110

HMD 105 आणि HMD 110 फीचर्स आणि स्पेक्स

HMD 105 आणि HMD 110 कारण फ्रेम डिझाइनवर बनवलेले आहेत. फोनच्या समोर वरच्या भागात आयताकृती स्क्रीन देण्यात आली आहे, तसेच खाली T9 कीपॅड दिसेल. या फीचर फोन्समध्ये बिल्ट-इन UPI ​​ॲप दिले आहे. हे दोन्ही मोबाईल इंटरनेटशिवायही ऑनलाइन पेमेंट आणि डिजिटल व्यवहार करण्यास सक्षम असतील. हे फोन्स MP3 प्लेयर आणि FM रेडिओ सपोर्टसह येतात. वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार ते वायर्ड किंवा वायरलेस दोन्ही पद्धतीने ऐकू शकतात.

विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HMD 105 आणि HMD 110 कीपॅड फोन्समध्ये कंपनीने 9 प्रादेशिक भाषांना सपोर्ट दिला गेला आहे. हे दोन्ही फीचर फोन एकूण 23 भाषा समजू शकतात. त्याबरोबरच, हे दोन्ही बटण फोन फोटो टॉकर आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंग सारख्या फीचर्सना देखील समर्थन देतात.

मात्र, यापैकी केवळ HMD 110 मध्ये फोटोग्राफीची सुविधा आहे. युजर्ससाठी ड्युअल एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. त्याच्या मागील पॅनलवर सिंगल कॅमेरा सेन्सर देण्यात आला असून त्यासोबत फ्लॅश लाईट देखील आहे. पॉवरसाठी दोन्ही फोनमध्ये 1,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo