फ्लॅगशिप किलर OnePlus कंपनीच्या एकमेव OnePlus Open फोल्डेबल स्मार्टफोनवर भारी डील उपलब्ध करून देण्यात आली आहे. OnePlus Open ची किंमत 99,999 रुपये म्हणजेच अंदाजे 1 लाख रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Amazon ने या फोल्डेबल फोनवर विलक्षण डील आणली आहे. या डील अंतर्गत तुम्ही OnePlus Open स्मार्टफोन फक्त 149 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही डील Amazon च्या Try and Buy सर्व्हिस अंतर्गत देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात OnePlus Open वरील स्पेशल डील-
Also Read: Lava Yuva 4 Launched: 50MP कॅमेरासह देशी कंपनीचा नवा फोन भारतात लाँच, किंमत 7 हजारांपेक्षा कमी
Amazon ने आपल्या ग्राहकांसाठी ट्राय अँड बाय सर्व्हिस आणली आहे. या सर्व्हिसअंतर्गत वापरकर्ते काही रक्कम देऊन प्रीमियम डिव्हाइस ऑर्डर करतात आणि नंतर काही काळ वापरून पाहतात. जर वापरकर्त्यांना डिव्हाइस आवडत असेल तर ते त्या डिव्हाइसची संपूर्ण रक्कम भरून Amazon वरून ते खरेदी करू शकतात. हीच सुविधा सध्या OnePlus Open सोबत सादर करण्यात आली आहे. यूजर्स OnePlus चा हा फोल्डेबल फोन Amazon वरून केवळ 149 रुपयांमध्ये ऑर्डर करण्यास सक्षम असतील.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, या सर्व्हिसअंतर्गत Amazon तुम्हाला डिव्हाइस वापरून पाहण्यासाठी संपूर्ण 20 मिनिटांचा वेळ देते. तुम्ही 20 मिनिटांअंतर्गत OnePlus Open संपूर्ण वापरून पाहू शकता. यादरम्यान, वापरकर्ते फोनवरून कॉल करू शकतात, गेम खेळू शकतात, फोटोग्राफी सुद्धा करू शकतात. 20 मिनिटांनंतर, वापरकर्त्यांना ते डिव्हाइस खरेदी करायचे आहे की नाही हे ठरवावे लागेल. Buy from Here
जर तुम्हाला एखादे उपकरण खरेदी करायचे आहे तर, तुम्हाला त्या उपकरणाची संपूर्ण रक्कम भरावी लागेल. तुम्ही डिव्हाइस वापरून पाहिल्यानंतर ते खरेदी करू इच्छित नसल्यास, Amazon प्रतिनिधीकडे डिव्हाइस परत करा.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, Amazon ची ही सेवा सध्या फक्त काही शहरांमध्ये लाइव्ह करण्यात आली आहे. सध्या ही सेवा दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली आहे. ही तीन शहरे सोडल्यास Amazon ट्राय अँड बाय सर्व्हिस इतर कोणत्याही शहरात उपलब्ध नाही.