cmf launching CMF Phone 2 Pro along with three buds in india
Nothing चा सब-ब्रँड CMF ने अखेर आपला दुसरा स्मार्टफोन बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी, कंपनीने गेल्या वर्षी भारतात CMF ब्रँड अंतर्गत पहिला फोन, CMF Phone 1 लाँच केला होता. आता कंपनीने CMF Phone 2 Pro सादर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनच्या लाँचिंगची माहिती आधीच देण्यात आली आहे. आज कंपनीने फोनच्या लाँचिंग तारीख देखील जाहीर केली आहे.
Also Read: Vivo X200s आणि Vivo X200 Ultra ‘या’ दिवशी करणार जबरदस्त एन्ट्री, काय मिळेल विशेष?
आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनची विक्री इ-कॉमर्स साईट Flipkart वर उपलब्ध असेल. त्याबरोबरच, या फोनच्या कलर ऑप्शन्सबद्दलही माहिती देण्यात आली आहे. जाणून घ्या सविस्तर-
CMF कंपनीने CMF Phone 2 Pro फोनच्या लाँचिंग तारखेची पुष्टी केली आहे. यापूर्वी, कंपनीने गेल्या वर्षी जुलैमध्ये पहिला फोन CMF Phone 1 लाँच केला होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा फोन भारतात 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.30 वाजता लाँच होईल. आम्ही सांगितल्याप्रमाणे, हा या ब्रँडचा दुसरा फोन असणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, CMF Phone 2 Pro फोनची विक्री इ-कॉमर्स साईट Flipkart वर उपलब्ध असेल. या फोनसाठी मायक्रोसाइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे. फोनच्या डिझाइनची माहितीही Flipkart लिस्टिंगद्वारे उपलब्ध आहे. टीझर पोस्टरद्वारे फोनच्या कॅमेरा सेटअपची झलक देखील पाहता येईल.
या फोनवर दोन मोठे राखाडी वर्तुळ दिसत आहेत, ज्याच्या पुढे एक लहान ग्रे सर्कलआणि एक ऑरेंज सर्कल आहे. त्यावरून या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, असे समजते. ज्यामध्ये अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि प्रायमरी कॅमेऱ्यासह तिसरा कॅमेरा असेल. या सेन्सर्ससह, फोनमधील ऑरेंज सर्कल फ्लॅश लाईट दर्शवते.
लीकवर विश्वास ठेवला तर, आगामी CMF Phone 2 Pro फोनमध्ये 6.77 इंच लांबीचा डिस्प्ले मिळू शकतो. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर मिळेल, अशी अपेक्षा आहे. तर, बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल, ज्यामध्ये 50W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध मिळू शकतो.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या आगामी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या सेटअपमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 50MP टेलिफोटो सेन्सर मिळू शकतो. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो. मात्र, हे सर्व फीचर्स फोन लाँच झाल्यानंतरच कन्फर्म होतील.