9000 रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय Xiaomi स्मार्टफोन, मिळेल 64MP ट्रिपल कॅमेरा आणि 128GB स्टोरेज

9000 रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय  Xiaomi स्मार्टफोन, मिळेल 64MP ट्रिपल कॅमेरा आणि 128GB स्टोरेज

ई-कॉमर्स वेबसाइट्स स्मार्टफोन्सवर वेगवेगळ्या डील आणत असतात. Amazon India Xiaomi च्या जबरदस्त फोनवर भारी सूट देत आहे. हा फोन तुम्हाला 9000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.  स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 128 GB स्टोरेज सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनचे नाव Xiaomi 11 Lite NE 5G आहे, जो अतिशय स्लिम आणि हलका 5G स्मार्टफोन आहे.

फोनची किंमत आणि ऑफर

या स्मार्टफोनचे बेस मॉडेल 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येते. स्मार्टफोनची किंमत 31,999 रुपये आहे, जो  Amazon वर 22 टक्के सवलतीनंतर 24,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. एवढेच नाही तर सर्व बँकांच्या कार्डवर 2000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळतेय. यानंतर तुम्हाला हा फोन 23,999 रुपयांना मिळेल. म्हणजेच तुम्हाला एकूण 9000 रुपयांची सूट मिळणार आहे. येथून खरेदी करा… 

xiaomi 11 lite ne 5g

हे सुद्धा वाचा : पैशांची नितांत गरज आहे? WhatsApp वर केवळ 30 सेकंदात कर्ज मिळेल, बघा संपूर्ण प्रक्रिया

Xiaomi 11 Lite NE 5G 

Xiaomi 11 Lite NE फोनमध्ये 6.55-इंच लांबीचा 10-बिट AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले फुल HD + रिझोल्यूशन, डॉल्बी व्हिजन आणि HDR10 + सपोर्टसह येतो. त्याचा रीफ्रेश रेट 90Hz पर्यंत पोहोचू शकतो. प्रोटेक्शन्साठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 बसवण्यात आला आहे. नवीन Xiaomi स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह येतो.

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64MP प्राथमिक लेन्स, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 5MP टेलिमॅक्रो लेन्स मिळतात. डिव्हाइसला 20MP फ्रंट-फेसिंग सेन्सर मिळतो. डिव्हाइसमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,250mAh बॅटरी आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo