पैशांची नितांत गरज आहे? WhatsApp वर केवळ 30 सेकंदात कर्ज मिळेल, बघा संपूर्ण प्रक्रिया

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 17 Jun 2022
HIGHLIGHTS
  • WhatsApp ग्राहकांसाठी आणली नवीन सुविधा

  • WhatsApp वर केवळ 30 सेकंदात मिळेल कर्ज

  • कर्ज मिळवण्यासाठी बघा संपूर्ण प्रक्रिया

पैशांची नितांत गरज आहे? WhatsApp वर केवळ 30 सेकंदात कर्ज मिळेल, बघा संपूर्ण प्रक्रिया
पैशांची नितांत गरज आहे? WhatsApp वर केवळ 30 सेकंदात कर्ज मिळेल, बघा संपूर्ण प्रक्रिया

अगदी तातडीने पैशांची गरज आहे, आता व्हॉट्सऍपवर चुटकीसरशी पैशांची व्यवस्था केली जाईल. खरं तर, व्हॉट्सऍप वापरकर्ते आता 30 सेकंदात त्यांचे नाव टाइप करून त्वरित कर्ज मिळवू शकतात. हे फीचर फायनान्शियल वेलनेस प्लॅटफॉर्म CASHe ने WhatsApp वर AI चॅट फीचर वापरून लाँच केले आहे. विशेष म्हणजे, कर्जाचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याला कोणतीही कागदपत्रे देण्याची, कोणतेही ऍप डाउनलोड करण्याची किंवा कोणताही फॉर्म सबमिट करण्याची गरज नाही. आता तुम्ही विचार करत असाल की कर्ज कसे मिळवायचे? चला तर समजून घेऊयात सर्व तपशील... 

KYC ऍटोमॅटिक तपासला जाईल 

एका अहवालात असे समोर आले आहे की, 'हे फिचर एक AI-पावर्ड बॉट आहे, जो ग्राहकांच्या इनपुटशी जुळतो  आणि ऍटोमॅटिकली KYC तपासण्याबरोबरच फॉर्मल रिक्वेस्टची सुविधा प्रदान करतो. एकदा वेरिफाइड  झाल्यानंतर, काही क्लिक्समध्येच तुम्हाला क्रेडिट लाइन मिळेल. म्हणजेच तुम्हाला कमाल किती कर्ज मिळू शकतो, याची माहिती मिळेल.  

हे सुद्धा वाचा : 15 हजार रुपयांच्या बजेटमधील 5 सर्वोत्कृष्ट फोनची यादी, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

 या नंबरवर Hi करा 

एका अहवालानुसार, WhatsApp वापरकर्ते फक्त +91 80975 53191 नंबर सेव्ह करून (CASHe) वापरून झटपट कर्ज मिळवू शकतात. नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सऍप चॅट बॉक्समध्ये जाऊन 'Hi' टाइप करून पाठवावे लागेल. तुम्ही मेसेज पाठवताच WhatsApp बिझनेस वापरकर्त्यांना प्री-अप्रुव्ड लोन मिळेल. या फीचर अंतर्गत, KYC आणि पडताळणीची प्रक्रिया AI पॉवर्ड मोडद्वारे केली जाईल आणि त्यानंतर क्रेडिट मर्यादा निश्चित केली जाईल. कृपया लक्षात घ्या की ही सुविधा फक्त पेड कस्टमर्ससाठी आहे.

बघा संपूर्ण प्रक्रिया :

- सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये +91 80975 53191 नंबर सेव्ह करा.

- आता WhatsApp चॅट बॉक्सवर जा आणि Hi टाइप करा.

- Hi टाइप केल्यावर, तुम्हाला दोन पर्याय मिळतील. गेट इन्स्टंट क्रेडिट आणि ऑप्शन्स.

- कर्ज मिळवण्यासाठी गेट इन्स्टंट क्रेडिट वर क्लिक करा.

- आता पॅन कार्डमध्ये नमूद केलेले नाव टाका.

- आता CASHe ची प्रायव्हसी पॉलिसी आणि टर्म्स अँड कंडिशन कन्फर्म करा. 

- आता तुमचा पॅन क्रमांक तुमच्या समोर दिसेल, ते कन्फर्म करा.

- पॅन नंबर तपासल्यानंतर, प्रोसिड टू चेक DOB वर क्लिक करा.

- आता बॉट तुमचे KYC तपासेल. यासाठी Proceed to Check वर क्लिक करा.

- KYC कन्फर्म झाल्यानंतर तुमचा पत्ता दिसेल, ते कन्फर्म करा.

- सर्व माहिती तपासल्यानंतर, तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे सांगितले जाईल.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. This Is My First Time To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. I Also love to write on different topics and reading books. Read More

Tags:
WHATSAPP INSTALL WHATSAPP NEW WHATSAPP
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements