Vivo Y300 Plus 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने मागील वर्षी आपला Vivo Y300 Plus 5G भारतात लाँच केला. सध्या विवो अनेक फोन्स लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, कंपनी आपल्या जुन्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सवलती ऑफर करत आहे. होय, सध्या प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर Vivo Y300 Plus 5G फोन हजारो रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसारखे जबरदस्त फीचर्स मिळतील. जाणून घेऊयात Vivo Y300 Plus 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: Best Camera Phones Under 20000: अप्रतिम कॅमेरासह शीर्षस्थानी आहेत हे ‘5’ स्मार्टफोन्स, पहा यादी
Vivo Y300 Plus 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Flipkart वर 29,999 रुपये इतकी आहे. या फोनवरील डिस्काउंटबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन सध्या 6000 रुपयांच्या थेट डिस्काउंटसह 23,999 रुपयांना उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, बँक कार्डद्वारे या फोनवर 2000 रुपयांची वेगळी ऑफर देखील उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Vivo Y300 Plus 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2400x 1080 पिक्सेल इतके आहे. पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP54 रेटिंग देण्यात आले आहे.
उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या Vivo Y300 Plus 5G फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर उपलब्ध आहे. हा प्रोसेसर 5G कनेक्टिव्हिटी आणि पॉवर कार्यक्षमता यांचे संतुलन प्रदान करतो. तसेच, गेमिंग, मल्टीटास्किंग आणि मल्टीमीडिया वापर यासारख्या क्षेत्रांमध्ये ते उत्कृष्ट आहे.
Vivo Y300 Plus 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP चा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे या फोनमध्ये 2MP चा कॅमेरा मिळणार आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.
बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo Y300 Plus 5G फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी 44W फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येते. वेब सर्फिंगसारख्या बेसिक कार्यांसह ही बॅटरी तब्बल 2 दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवतो.