VIVO X200 PRO 5G
लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच आपला प्रीमियम स्मार्टफोन Vivo X200 Pro 5G भारतीय बाजारात लाँच केला. नक्कीच हा कंपनीचा महागड्या बजेटमध्ये येणारा स्मार्टफोन आहे. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर, काळजी करण्याची गरज नाही. सध्या प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर हा फोन अगदी मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहे. हा फोन खरेदी करताना तुमची हजारो रुपयांची बचत होईल. जाणून घेऊयात Vivo X200 Pro 5G ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Also Read: लेटेस्ट OnePlus Nord 4 5G फोनवर मिळतोय 7000 रुपयांचा Discount, हजारो रुपयांची बचत करण्याची संधी
Vivo X200 Pro हा कंपनीचा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. या डिव्हाइसचे 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेल ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वरून 94,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, क्रेडिट कार्डद्वारे Vivo X200 Pro स्मार्टफोन खरेदी केल्यास 7000 रुपयांची थेट सूट दिली जात आहे.
त्याबरोबरच, स्मार्टफोनवर 5% कॅशबॅक देखील दिला जात आहे. तसेच, या डिव्हाइसवर 4,652 रुपयांचा EMI दिला जात आहे. हा हँडसेट कॉसमॉस ब्लॅक आणि टायटॅनियम ग्रे कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Vivo X200 Pro मध्ये 6.78-इंच लांबीचा AMOLED कॅपेसिटिव्ह मल्टी-टच डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 2 नॅनो सिम कार्ड स्लॉट, 4G, 5G, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, OTG, FM, NFC, ई-सिम आणि USB टाइप-C पोर्ट दिले आहेत. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याला 30W वायरलेस फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी, Vivo च्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50MP Sony LYT-818 सेन्सर, 50MP वाइड-अँगल लेन्स आणि 200MP टेलिफोटो सेन्सर समाविष्ट आहे. या तुम्हाला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनचे समर्थन देखील मिळेल. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, Vivo X200 Pro मध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. विशेष म्हणजे यात अल्ट्रा एचडी डॉक्युमेंट, टाइम-लॅप्स, प्रो, पोर्ट्रेट, व्हिडिओ, स्टेज, पॅनो आणि सुपरमून फीचर्स आहेत.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.