vivo v40e 5g
सध्या भारतातील लोकप्रिय इ-कॉमर्स साईट Flipkart वर Flipkart OMG (Oh My Gadgets) Sale सुरु आहे. ही सेल येत्या 19 जानेवारीपर्यंत लाईव्ह असणार आहे. या सेलदरम्यान, महागड्या स्मार्टफोन्स धमाकेदार डिस्काउंट आणि ऑफर्स दिले जात आहेत. सध्या Vivo स्मार्टफोन निर्माता अग्रस्थानी असल्यामुळे कंपनीचे महागडे स्मार्टफोन्स मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. नुकतेच कंपनीने Vivo V50 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. दरम्यान, या सेलमध्ये Vivo V40e 5G स्मार्टफोनवर भारी डिस्काउंट दिला जात आहे. पाहुयात ऑफर्स-
Also Read: Launched! 50MP सेल्फी कॅमेरासह Vivo V50 5G फोन भारतात लाँच, Aura Light सह मिळतील भारी फीचर्स
Vivo V40e 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किमत Flipkart वर 33,999 रुपये इतकी आहे. परंतु OMG सेल दरम्यान तो खूपच स्वस्तात खरेदी करता येईल. Vivo V40e 5G फोनच्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 7000 रुपयांच्या डिस्काउंटसह 26,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. याशिवाय, तुम्हाला बँक कार्डद्वारे 2000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. अशाप्रकारे तुम्हाला या फोनवर तब्बल 9000 रुपयांची सूट मिळवता येईल. येथून खरेदी करा
Vivo V40e 5G फोनमध्ये 6.77-इंच लांबीचा FHD+ AMOLED 3D कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120hz आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, हा फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल. तर, पाण्यापासून संरक्षणासाठी या फोनला IP64 रेटिंग मिळाले आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V40e 5G फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB आणि 256GB स्टोरेज मिळेल.
कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V40e 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह येतो. याशिवाय, सेटअपमध्ये दुसरा 8MP कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, सेल्फीच्या शौकीन युजर्ससाठी फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यासह तुम्हाला 80W फास्ट चार्जिंग मिळेल. ही बॅटरी मूलभूत कार्यांसह दीर्घकाळापर्यंत टिकेल.