8,800 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Samsung फोन खरेदी करा, 48MP कॅमेरासह मिळेल 6000mAh बॅटरी

Updated on 16-Jun-2022
HIGHLIGHTS

सतत वाढत्या महागाईमध्ये नवीन गॅजेट्सच्या किमतीसुद्धा वाढत आहेत. अशामध्ये जर ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत एखादे ब्रँडेड फोन हवे असेल, तर आता बरेच पर्याय बाजारात विशेष सवलतींसह उपलब्ध आहेत. या यादीमध्ये सध्या एक स्मार्टफोन समाविष्ट झाले आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल पण बजेट खूपच कमी असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला Samsung ब्रँडेड फोनही अगदी स्वस्त दरात खरेदी करता येईल. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर तुम्ही Samsung Galaxy F12 स्मार्टफोन 9000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh बॅटरी आणि 48 मेगापिक्सेल रियर कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात फोनवरील ऑफर…

Samsung Galaxy F12 ची किंमत आणि ऑफर

या स्मार्टफोनचे 4 GB आणि 64 GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 9,499 रुपयांना विकले जात आहेत, तर त्याची खरी किंमत 12,999 रुपये आहे. यासोबतच तुम्हाला Axis Bank क्रेडिट कार्डवर 750 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळत आहे, त्यानंतर तुम्हाला हा फोन 8,749 रुपयांना मिळेल. येथून खरेदी करा… 

हे सुद्धा वाचा : खरंच ! VI च्या मोबाइल रिचार्जवर मिळतोय तब्बल 2,400 रुपयांचा कॅशबॅक, वाचा सविस्तर

Samsung Galaxy F12 चे फीचर्स

Samsung Galaxy F12 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच लांबीचा HD डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये 4 GB RAM, Exynos 850 प्रोसेसरसह 128 GB पर्यंत स्टोरेज आहे. विशेष बाब म्हणजे फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.

यामध्ये चार रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. मागील कॅमेरामध्ये 48-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोन 6,000mAh च्या मजबूत बॅटरीसह येतो. स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये 15W USB-C फास्ट चार्जर दिला गेला आहे. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :